Mumbai Crime : मानखुर्दच्या अफसानाचा उच्च न्यायालयाच्या आवारात गोंधळ, पोलिसांवर हल्ला

अखेर तीला आवर घालण्यासाठी आझाद मैदान पोलिस ठाण्याकडून महिला पोलिसांची अधिक कुमक मागविण्यात आली.

255
अखेर तीला आवर घालण्यासाठी आझाद मैदान पोलिस ठाण्याकडून महिला पोलिसांची अधिक कुमक मागविण्यात आली.
अखेर तीला आवर घालण्यासाठी आझाद मैदान पोलिस ठाण्याकडून महिला पोलिसांची अधिक कुमक मागविण्यात आली.

एका महिलेने उच्च न्यायालयाच्या आवारात गोंधळ घालून सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.या महिलेने घातलेल्या गोंधळामुळे न्यायालय परिसर दणाणून गेला होता. ‘मुझे हायकोर्ट में मुकदमा दर्ज करना है’ असे बोलत तीने न्यायकक्षेत जाण्याचा प्रयत्न केला. (Mumbai Crime)

न्यायालयात तैनात पोलीस कर्मचारी यांनी या महिलेवर आवर घालून तीला आझाद मैदान पोलीस ठाण्यात आणले. आझाद मैदान पोलिसांनी सरकारी कर्मचारी यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तीला अटक केली आहे. आफसाना अब्बास अली खातुन उर्फ अन्सारी (३६) असे या महिलेचे नाव असून ती , लल्लुभाई कंम्पाउंड,मंडाला मानखुर्द, येथे राहणारी आहे. बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आफसाना ही मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी आली, व न्यायालयात प्रवेश करू लागतात सुरक्षेसाठी तैनात महिला पोलिसांनी तीला अडवून कुठे जायचे असे बोलून तिच्याकडे चौकशी केली. मात्र अफसाना ही ‘मुझे हायकोर्ट में मुकदमा दर्ज करना है’ असे मोठ्याने बोलुन आत जाण्याचा प्रयत्न करू लागली. (Mumbai Crime)

(हेही वाचा :  Veer Savarkar : ‘त्या तिघी…स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ नाटकाचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात विनामूल्य प्रयोग )

महिला पोलीस शिपाईने तीला अडवले असता तिने महिला पोलिसाच्या डाव्या आंगठ्याला कडकडून चावा घेतला, व नखाने हाताला मानेवर ओरबडून महिला पोलीसाच्या छातीवर लाथेने प्रहार करून खाली पाडले आणि पोलीस महिलेचे केस धरून ओढू लागली. दरम्यान कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी या महिलेच्या तावडीतून महिला पोलिसाची सुटका करून तीला आवर घालण्याचा प्रयत्न केला. (Mumbai Crime)
परंतु ती ऐकण्याचा मनस्थितीत नव्हती, ‘मुझे पोलीस के उपर विश्वास नहीं है, मुझे जज के पास कंप्लेंट करने के लिए जाना है, मुझे जज से ही मिलना है, मुझे किसी के उपर भरोसा नहीं है, पुलीस वाले खाना देकर जंहेर खिलाते है’ असे जोरजोरात बोलून आरडाओरडा करीत होती.अखेर तीला आवर घालण्यासाठी आझाद मैदान पोलिस ठाण्याकडून महिला पोलिसांची अधिक कुमक मागविण्यात आली.

पोलिसांनी तीला आवर घालून ताब्यात घेऊन पोलीस व्हॅन मध्ये बसवत असताना तीने जमिनीवर लोळायला लागली, पोलिसांनी तीला उचलुन पोलीस व्हॅन मध्ये बसवले असता पोलीस व्हॅनमध्ये तीने मधील पोलिसांना चावून त्यांच्यावर हल्ला केला.अखेर तीला कसेबसे पोलीस ठाण्यात आणून तीच्यावर आझाद मैदान पोलिसांनी सरकारी कर्मचारी यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तीला अटक केली आहे.मात्र, अफसाना या महिलेला न्यायालयात कुणा विरुद्ध खटला दाखल करायचा होता याबाबत पोलिसांनी काहीही सांगितले नसुन तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.Mumbai Crime

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.