Cyber Fraud : लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना गुगलचा दणका, ‘हे’ बोगस ॲप केले डिलीट

जर तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप असतील आणि तुम्ही त्याचा वापर करत असाल तर वेळीच याचा वापर करणं बंद करा असे गुगलने सुचवले आहे

262
Cyber Fraud : लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना गुगलचा दणका, 'हे' बोगस ॲप केले डिलीट

काही दिवसांपूर्वी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून तब्बल १०० हून अधिक (Cyber Fraud) फेक वेबसाइट ब्लॉक करण्यात आल्या. या वेबसाइट्स आर्गनाइज्ड इन्वेस्टमेंट आणि टास्क-बेस्ड पार्ट-टाइम जॉब फ्रॉड करत असल्याचा आरोप होता. अशातच आता स्वतः गुगल कडून देखील काही फेक ॲप डिलिट करण्यात आले आहेत.

लाखो लोकांनी डाऊनलोड केलेले १८ स्पाय लोन ॲप हे गूगलने प्ले स्टोअर मधून डिलीट (Cyber Fraud) केले आहेत. ईएसईटी या सॉफ्टवेअर कंपनीने याबाबत एक अहवाल जरी केला आहे. त्या अहवालानुसार हे स्पाय लोन ॲप तुम्हाला कोणतीही कल्पना न देता तुमची वैयक्तिक माहिती चोरी करत होते. त्यामुळे हे ॲप तुमच्या मोबाईलमधून डिलीट करण्याची विनंती गुगलने केली आहे.

(हेही वाचा – Nawab Malik प्रकरणात मनसेची उडी; ट्विट करून स्पष्ट केली नाराजी)

डिलीट केलेले ॲप कोणते ?

AA Kredit, Amor Cash, GuayabaCash, EasyCredit, Cashwow, Credibus, FlashLoan, PréstamosCrédito, Préstamos De Crédito-YumiCash, Go Crédito, Instantáneo Préstamo, Cartera grande, Finupp Lending, 4S Cash, TrueNaira, EasyCash

हे धोकादायक (Cyber Fraud) ॲप गुगलकडून काढून टाकण्यात आले आहेत.

अशातच जर तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप (Cyber Fraud) असतील आणि तुम्ही त्याचा वापर करत असाल तर वेळीच याचा वापर करणं बंद करा असे गुगलने सुचवले आहे. मात्र एकूण किती भारतीय या धोकादायक ॲपचा वापर करतात याची अधिकृत आकडेवारी अजून समोर आलेली नाही. मात्र आपण कोणतेही नवीन ॲप वापरताना काळजी घेणे गरजेचे झाले आहे. (Cyber Fraud)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.