NIA Raid : एनआयए ची मोठी कारवाई, ४४ ठिकाणी छापेमारी, १३ संशयित ताब्यात

इसिस या संघटनेचा राज्यातील मुख्य पाया पडघ्यात रोवण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

257
NIA Raid : एनआयए ची मोठी कारवाई, ४४ ठिकाणी छापेमारी, १३ संशयित ताब्यात
NIA Raid : एनआयए ची मोठी कारवाई, ४४ ठिकाणी छापेमारी, १३ संशयित ताब्यात

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राज्य दहशतवादी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. शनिवारी ( ९ डिसेंबर) रोजी एनआयए ने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही भागात सकाळपासून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एकूण ४४ ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. ही छापेमारी इसिस या दहशतवादी संघटनेच्या संबंधी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (NIA Raid )

कर्नाटक राज्यासह महाराष्ट्रातील पुणे,ठाणे आणि भाईंदर असे ४४ ठिकाणांपैकी सर्वात अधिक छापेमारी ठिकाणे ठाणे ग्रामीण परिसरात असल्याची माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली आहे. कर्नाटकात १ पुण्यात दोन ठिकाणी तर ठाणे ग्रामीणमध्ये ३१ ठिकाणे, ठाणे शहरातील ९ ठिकाणे भाईंदरमध्ये १ अशा ४४ ठिकाणे इसिस ही दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचे समोर आले आहे. (NIA Raid )

बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साकिब नाचणसह बोरिवली पडघा परिसरातून १३  जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, ताब्यात घेण्यात आलेल्या कडून इसिस संबंधी काही सामुग्री जप्त करण्यात आली आहे.भिवंडीतील पडघा आणि बोरिवली गाव या ठिकाणी सर्वाधिक छापे टाकण्यात आले आहे. इसिस या संघटनेचा राज्यातील मुख्य पाया पडघ्यात रोवण्यात येत असल्याचे समोर आले आहे.यापूर्वी पडघ्यातुन एनआयए ने साकीब नाचन चा मुलगा शमील नाचन, नातेवाईक अकिल नाचन सह काही जणांना पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शहापूर तालुक्यातील दोन ठिकाणी आणि कल्याण येथून एक ठिकाणी छापे टाकून येथून २जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

(हेही वाचा : Cyber Fraud : लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना गुगलचा दणका, ‘हे’ बोगस ॲप केले डिलीट)

 या छापेमारीत सापडलेले दहशतवादी हे देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहितीही समोर आली आहे. त्यांच्याकडून बॉम्ब ब्लास्टचे साहित्यही एनआयएने जप्त केले आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात देशभरात दहशतवाद आणि हिंसाचार पसरविण्याच्या पुणे इसिस मॉड्युल प्रकरण उघडकीस येत असताना पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेला मोहम्मद शाहनवाज आलम दहशतवाद्याला एनआयएने अटक केली होती. त्याच्याविरुद्ध दिल्लीत दहशतवादी कृत्य केल्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.