NIA Raid : भिवंडीतील पडघासह राज्यात ४३ ठिकाणी एनआयएची छापेमारी, साकीब नाचनसह १५जण ताब्यात

319
Padgha NIA Raid : 'मजलीश'मध्ये पॅलेस्टाईन, इस्लाम धोक्यात या विषयावर होत होती चर्चा
Padgha NIA Raid : 'मजलीश'मध्ये पॅलेस्टाईन, इस्लाम धोक्यात या विषयावर होत होती चर्चा

संतोष वाघ

इसिस पुणे मॉड्युल प्रकरणात एनआयएने (NIA Raid) (राष्ट्रीय तपास यंत्रणा) शनिवारी (९ डिसेंबर) भिवंडी तालुक्यातील पडघा बोरिवली, शहापूर, कल्याण, पुणे, आणि कर्नाटक असे एकूण ४४ ठिकाणी मोठ्या प्रमाणात छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान कुख्यात दहशतवादी साकीब नाचनसह १५ जणांना एनआयए कडून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या घरातून इस्लामिक, अरबी भाषेतील साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एनआयए ची देशभरातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

(हेही वाचा – Terrorist In Mumbai : मुंबईची गाझा पट्टी बनत आहे ठाणे जिल्ह्यातील ‘पडघा’)

स्थानिक पोलीस,राज्य दहशतवाद विरोधी (NIA Raid) पथकाच्या मदतीने एनआयएने शनिवारी पहाटेपासून ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर, पडघा बोरिवली,शहापूर आणि कल्याण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात छापेमारी सुरू केली आहे. एनआयएकडून छापेमारी दरम्यान पडघा आणि बोरिवली गावाचा परिसर सील करण्यात आला आहे. गावाबाहेर स्थानिक ५०० पोलिसांची फौज बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे.

(हेही वाचा – NIA Raid :’त्या’ दहशतवादी मॉड्यूलचा पाकिस्तानशी संबंध, अनेक राज्यात एनआयची छापेमारी)

एटीएस,एनआयए कडून सुरू असलेल्या या छापेमारी दरम्यान (NIA Raid) स्थानिक नागरिकांनी प्रथम विरोध दर्शविला,मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिलांनी पोलिसांच्या या कारवाईमध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली.

या कारवाई दरम्यान (NIA Raid) एनआयए कडून पडघा बोरिवली, शहापूर आणि कल्याण येथून कुख्यात दहशतवादी २००३ मध्ये मुंबईतील बॉम्बस्फोटातील आरोपी साकीब नाचन याच्यासह हसीब मुल्ला,मुसाब मुल्ला, रेहान सुसे, फरहान सुसे, फिरोज कुवर,आदिल खोत, मुखलिस नाचण, सैफ अतिक नाचन, याह्या खोत,राफेल नाचन, रझेल नाचण, शकुब दिवकर,कासिफ बेलारे आणि मुंढिर केप यांना ताब्यात घेऊन त्यांच्या घरावर छापेमारी करून काही महत्वाचे कागदपत्रे तसेच इसिस या दहशतवादी संघटने सबंधी महत्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Khopoli Drugs Case : तब्बल १०७ कोटींचे ड्रग्ज जप्त; तिघांना अटक)

छाप्यांदरम्यान, एनआयएने (NIA Raid) दहशतवाद्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि परदेशी स्थित आयएसआयएस हँडलर्सच्या सहभागासह मोठ्या कटाचा पर्दाफाश केला आहे. एनआयएच्या तपासात भारतामध्ये इसिसच्या दहशतवादी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी कटिबद्ध लोकांचे एक जटिल नेटवर्क उघड झाले आहे. या नेटवर्कने इसिसच्या स्वयंघोषित खलीफा (नेत्या)शी एकनिष्ठ असल्याची शपथ घेतली आणि नेटवर्क सुधारित स्फोटक उपकरणे (IEDs) देखील तयार करत होते. भारतीय भूमीवर दहशतवादी कारवाया करणे हा या दहशतवादी संघटनेचा उद्देश होता अशी माहिती समोर येत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.