- ऋजुता लुकतुके
आधीच दोघांमध्ये मैदानावरच वाद झाला असताना गंभीर (Gautam Gambhir) बाद झाल्यावर श्रीशांतने (Sreesanth) केलेला जाहीर जल्लोष लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. (Gautam Gambhir-Sreesanth Spat)
गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि श्रीशांत (Sreesanth) यांच्यातील वाद आणि त्यावरील चर्चा कमी व्हायचं नाव घेत नाहीए. आता गौतम गंभीर (Gautam Gambhir) नेतृत्व करत असलेल्या इंडिया कॅपिटल्स संघाचं लिजंड्स लीग स्पर्धेतून आव्हान संपुष्टात आलं. मणिपाल टायगर्स संघाने त्यांचा सहा गडी राखून पराभव केला. गौतम गंभीर (Gautam Gambhir) ५ चेंडूत १० धावा करून या सामन्यात बाद झाला. गंभीरने चेंडू कव्हर-पॉइंटच्या दिशेनं मारला आणि एकरी धाव घेण्याच्या इराद्याने धावलेला गंभीर वेळेत दुसरं टोक गाठू शकला नाही आणि तोपर्यंत अमितोझ सिंगने यष्ट्यांचा अचूक वेध घेतलेला होता. (Gautam Gambhir-Sreesanth Spat)
गंभीर (Gautam Gambhir) कसा बाद झाला तो क्षण तुम्ही इथं पाहू शकता. (Gautam Gambhir-Sreesanth Spat)
Amitoze ch naam jiwein ae trend ni! 🔥
A stunning run-out that left even Gautam Gambhir in awe!🫣#LegendsLeagueCricket #LLCT20 #BossLogonKaGame @manipal_tigers pic.twitter.com/iFYn5u7MeS
— Legends League Cricket (@llct20) December 7, 2023
(हेही वाचा – Gautam Gambhir-Sreesanth Spat : गंभीर-श्रीशांत भांडणाच्या वेळी मैदानावर नेमकं काय घडलं पहा या व्हिडिओत)
गंभीरच्या इंडिया कॅपिटल्स संघाचं स्पर्धेतील आव्हान या पराभवानंतर संपुष्टात आलं. तर श्रीशांतचा (Sreesanth) गुजरात जायंट्स संघ आधीच बाहेर फेकला गेला होता. पण, गंभीरच्या धावचीतनंतर श्रीशांतने (Sreesanth) तो फेटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत शेअर केला आणि खाली थेटफेक करणाऱ्या अमितोझ सिंगला अभिनंदनपर संदेश लिहिला. (Gautam Gambhir-Sreesanth Spat)
दोघांमध्ये आधीच्यात सामन्यात भांडण झालेलं असताना आणि त्यावरून वाद निर्माण झालेला असताना श्रीसंतने अशाप्रकारे सोशल मीडियावर मत प्रदर्शन केल्यामुळे पुन्हा एकदा लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. श्रीसंतवर (Sreesanth) या वादाच्या पार्श्वभूमीवर लिजंड्स लीग क्रिकेट स्पर्धेनं कायदेशीर नोटीसही बजावली आहे. (Gautam Gambhir-Sreesanth Spat)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community