Gautam Gambhir-Sreesanth Spat : लिजंड्स लीग क्रिकेट स्पर्धेची श्रीशांतला कायदेशीर नोटीस

६ डिसेंबरला इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात गौतम गंभीर आणि श्रीशांत यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यावर आता आयोजकांनी श्रीशांतला नोटीस बजावलीय.

242
Gautam Gambhir-Sreesanth Spat : लिजंड्स लीग क्रिकेट स्पर्धेची श्रीशांतला कायदेशीर नोटीस
Gautam Gambhir-Sreesanth Spat : लिजंड्स लीग क्रिकेट स्पर्धेची श्रीशांतला कायदेशीर नोटीस
  • ऋजुता लुकतुके

६ डिसेंबरला इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि श्रीशांत (Sreesanth) यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यावर आता आयोजकांनी श्रीशांतला (Sreesanth) नोटीस बजावलीय. (Gautam Gambhir-Sreesanth Spat)

लिजंड्स लीग क्रिकेट स्पर्धेच्या आयुक्तांनी एस श्रीशांतवर (Sreesanth) कायदेशीर नोटीस बजावली आहे आणि यात त्यांनी श्रीशांतवर (Sreesanth) स्पर्धेचे नियम मोडल्याचा आरोप केला आहे. तसंच स्पर्धेतील एका सामन्यावेळी घडलेला जो प्रसंग श्रीशांतने (Sreesanth) लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर शेअर केला, तो काढून टाकण्याचे निर्देशही दिले आहेत. गंभीर (Gautam Gambhir) आणि श्रीशांत (Sreesanth) दोघंही माजी भारतीय खेळाडू आहेत आणि २००६ ते २०११ च्या कालावधीत राष्ट्रीय संघात एकत्र खेळलेले आहेत. (Gautam Gambhir-Sreesanth Spat)

पण, ६ डिसेंबरला लिजंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत झालेल्या सामन्यांत मैदानावरच दोघांमध्ये भांडण झालं आणि इतर खेळाडूंना दोघांना बाजूला करावं लागलं. श्रीशांतने Sreesanth) नंतर एका व्हिडिओत गंभीरने त्याला फिक्सर म्हटल्याचा आरोप केला. (Gautam Gambhir-Sreesanth Spat)

(हेही वाचा – ICC ODI World Cup : आयसीसीने दिला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला साधारण खेळपट्टीचा दर्जा)

आपल्याबरोबर अपशब्द वापरले या आरोपाबरोबरच गंभीर इतर खेळाडूंशीही नीट वागत नाही, असं श्रीशांत (Sreesanth) या व्हिडिओत म्हणाला आहे. त्याच्या व्हिडिओनंतर हे प्रकरण चांगलंच गाजतंय. त्यामुळे लिजंड्स लीग क्रिकेटने ७ डिसेंबरलाच एक पत्रक काढून या प्रकरणाची अधिकृत चौकशी करण्याचा निर्णय जाहीर केला. तसंच अखिलाडू वृत्ती आणि असभ्य वर्तन हे स्पर्धेच्या नियमांत बसणारं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. (Gautam Gambhir-Sreesanth Spat)

त्यानंतर स्पर्धेचे सहसंस्थापक आणि सीईओ रमण रहेजा यांनी मीडियाशी बोलताना स्पर्धेत खेळणारे खेळाडू हे एका कराराने बांधलेले आहेत आणि त्यांच्याकडून असभ्य वर्तन झाल्यास करारभंग मानण्यात येईल, असं सांगितलं होतं. त्यानंतर पहिली कारवाई त्यांनी केलीय ती श्रीशांतला (Sreesanth) कायदेशीर नोटीस पाठवून आणि यात कराराचा भंग झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. श्रीशांत (Sreesanth) प्रतिनिधित्व करत असलेला गुजरात जायंट्स हा संघ आधीच स्पर्धेतून बाद झाला आहे. तर गंभीरचा इंडिया कॅपिटल्स संघ ७ डिसेंबरला बाद झाला. (Gautam Gambhir-Sreesanth Spat)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.