Single KYC For All Services : लवकरच सर्व प्रकारच्या आर्थिक सेवांसाठी एकच केवायसी चालणार

डिजिटल पेमेंट क्षेत्रात आता सिंगापूर आणि युएई सारख्या देशांनीही भारताची मदत घेतली आहे.

220
Single KYC For All Services : लवकरच सर्व प्रकारच्या आर्थिक सेवांसाठी एकच केवायसी चालणार
Single KYC For All Services : लवकरच सर्व प्रकारच्या आर्थिक सेवांसाठी एकच केवायसी चालणार
  • ऋजुता लुकतुके

डिजिटल पेमेंट क्षेत्रात (Digital Payment Sector) आता सिंगापूर आणि यूएई सारख्या देशांनीही भारताची मदत घेतली आहे. (Single KYC For All Services)

सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी (Financial transactions) भारतात केवायसी म्हणजेच नो युअर कस्टमर हा फॉर्म भरणं आवश्यक आहे. हा जरी एकच फॉर्म एकदाच भरायचा असला तरी बँकेतील प्रत्येक खातं आणि कुठलीही आर्थिक गुंतवणूक (Financial investment) यासाठी वेगवेगळा केवायसी फॉर्म सध्या भरायला लागतो. पण, ही कटकट येत्या काही महिन्यांतच मिटणार आहे. अर्थविषयक व्यवहार मंत्रालयाचे सचिव अजय शेठ यांनी तसं सुतोवाच मीडियाशी बोलताना केलं आहे. (Single KYC For All Services)

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी गेल्याच वर्षी पहिल्यांदा हा विचार बोलून दाखवला होता. आता ती वेळ जवळ आल्याचं शेठ यांनी फिक्की संस्थेच्या वार्षिक संमेलनात बोलताना सांगितलं. (Single KYC For All Services)

‘रिझर्व्ह बँकेच्या उपगव्हर्नरांच्या नेतृत्वाखाली सरकारने एक समिती स्थापन केली आहे आणि त्यांचं काम आता संपतच आलं आहे. त्यानंतर ग्राहकांनी एकदा सरकारकडे केवायसी प्रक्रिया पूर्ण केली की, त्यांच्या सर्व अर्थविषयक व्यवहार आणि खात्यांना ती लागू होईल. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करावी लागणार नाही,’ असं शेठ यांनी स्पष्ट केलं. (Single KYC For All Services)

(हेही वाचा – T. Raja Singh : प्रोटेम स्पीकर अकबरुद्दीन ओवैसी असतील तर मी जिवंत असेपर्यंत शपथ घेणार नाही; भाजपचे आमदार टी. राजासिंग यांचा विरोध )

सरकार तसंच वित्तीय संस्थांचा वेळ आणि खर्च त्यातून वाचेल, असं शेठ यांनी बोलून दाखवलं. (Single KYC For All Services)

भारतातील ऑनलाईन किंवा डिजिटल पेमेंट्स (Digital Payments) प्रणालीचं त्यांनी कौतुक केलं. डिजिटल पेमेंट (Digital Payments) आणि खासकरून युपीआयचं (UPI) जगभरात कौतुक होत असल्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. (Single KYC For All Services)

‘नुकतंच सिंगापूर देशाने आपल्याशी संपर्क साधून युपीआय (UPI) सदृश प्रणाली तिथे उभी करण्यासाठी आपली मदत घेतली. आता अगदी यूएई आणि अमेरिकेनंही यासाठी आपल्याकडे संपर्क साधला आहे,’ असं शेठ म्हणाले. डिजिटल पेमेंटमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत ४ टक्के भर पडल्याचं ते म्हणाले. (Single KYC For All Services)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.