Devendra Fadnavis : ड्रग्ज तस्करांशी हातमिळवणी करणारे पोलिस बडतर्फ होणार

केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राज्यांतील गृहमंत्र्यांची बैठक घेतली होती. यात ड्रग्जतस्करीचे नेटवर्क मोडून काढण्याबाबत सखोल चर्चा झाली.

229
Devendra Fadnavis : ड्रग्ज तस्करांशी हातमिळवणी करणारे पोलिस बडतर्फ होणार

ड्रग्ज विक्री करणाऱ्या अपराध्यांशी जर कुठल्या पोलिसाची हातमिळवणी आहे असे सिद्ध झाले तर केवळ निलंबित न करता थेट बडतर्फ केले जाईल अशी घोषणा (Devendra Fadnavis) राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शुक्रवारी विधानपरिषदेत केली.

यासंदर्भातील लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने बोलताना (Devendra Fadnavis) फडणवीस म्हणाले की, राज्यातील ड्रग्जविरोधात पोलीस विभागाची लढाईच सुरू आहे. परंतु, ड्रग्जविक्री करणाऱ्या आरोपींसोबत कुणी हातमिळावणी केली अथवा त्यांचे संगनमत असेल तर कलम ३११ अंतर्गत संबंधित पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फच करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली. अनिकेत तटकरे यांनी यासंदर्भातील मुद्दा मांडला होता.

(हेही वाचा – T. Raja Singh : प्रोटेम स्पीकर अकबरुद्दीन ओवैसी असतील तर मी जिवंत असेपर्यंत शपथ घेणार नाही; भाजपचे आमदार टी. राजासिंग यांचा विरोध )

खोपोलीत ७० ते ८० किलो एमडी पावडर जप्त झाल्याची बाब त्यांनी मांडली. त्यावर बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य शासनाची भूमिका मांडली. केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राज्यांतील गृहमंत्र्यांची बैठक घेतली होती. यात ड्रग्जतस्करीचे नेटवर्क मोडून काढण्याबाबत सखोल चर्चा झाली. तसे निर्देश राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. काही प्रकरणांमध्ये बंद कारखान्यांमध्ये अंमली पदार्थ तयार करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आली.

विशेषत: संभाजीनगर, रायगड, नाशिक, पुणे या भागांतील बंद कारखान्यांत हालचाल आढळल्यास तेथे छापे टाकण्याची कारवाई सुरू आहे. राज्यात पोलीस विभागातर्फे ड्रग्जविरोधात लढाई सुरू असून ती बराच काळ चालेल. अनेकदा बाहेरील राज्यातील पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. त्यांना मिळालेल्या ‘इंटेलिजन्स’च्या आधारावर ती कारवाई होते. मात्र बहुतांश प्रकरणात त्याची स्थानिक पोलिसांना पूर्वकल्पना देण्यात येत असल्याचे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.