MLA Nawab Malik : मलिकांना सत्ताधारी बाकावर बसवण्याचा नक्की गेम कोणाचा?

मलिकांच्या या सत्ताधारी बाकावर बसल्याने अधिवेशनात सत्ताधारी विरुध्द विरोधी पक्षांमध्ये जोरदार टिकाटिप्पणी होत असल्याने अधिवेशनातील वातावरण काहीसे तापले आहे.

288
Nawab Malik विधानसभा स्वतःच्या बालेकिल्ल्यातून लढणार नाही, मग कुठून लढणार ?

नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार नवाब मलिक यांनी हजेरी लावत थेट सत्ताधारी बाकावर जाऊन बसले. मलिकांच्या या सत्ताधारी बाकावर बसल्याने अधिवेशनात सत्ताधारी विरुध्द विरोधी पक्षांमध्ये जोरदार टिकाटिप्पणी होत असल्याने अधिवेशनातील वातावरण काहीसे तापले आहे. मात्र, मलिकांना सत्ताधारी बाकावर बसवण्याचा नक्की गेम कुणाचा असा सवाल केला जात असून मलिकांना या बाकावर बसवण्यामागचे सुत्रधार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असल्याची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. (MLA Nawab Malik)

विरोधकांचे सत्ताधारी पक्षावर तोंडसुख

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे मनी लाँड्रिंग प्रकरणात मागील दीड वर्षांहून अधिक काळ अटकेत होते. त्यानंतर या प्रकरणात त्यांना वैद्यकीय कारणामुळे सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामीनावर असलेले मलिक हे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहिले आणि त्यांनी विरोधी बाकावर बसण्याऐवजी सत्ताधारी बाकावर ते जावून बसले. मलिक हे सत्ताधारी बाकावर बसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर तोंडसुख घेत दाऊदशी संबंध असलेल्या मलिक यांच्या मांडीला मांडी लावून भाजप कशी बसते असा सवाल केला. (MLA Nawab Malik)

(हेही वाचा – Pramod Mutalik : प्रियांक खरगेंना प्रमोद मुतालिकांचे आव्हान; वीर सावरकरांचा ‘तो’ फोटो काढूनच दाखवा)

महायुतीत घेणे योग्य नाही

भाजपच्यावतीने याचा समाचार घेतला गेला असला तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यानंतर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून सत्ता येते जाते, आपला देश महत्वाचा आहे असे सांगत मलिक यांना महायुतीत घेणे योग्य नाही असे कळवले. त्यामुळे मलिक यांच्यावरुनच सध्या अधिवेशनातील वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. (MLA Nawab Malik)

भाजपला बदमान करण्याची संधी

मात्र, मलिक यांना सत्ताधारी बाकावर बसवण्याचा प्लॅन हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा असू शकतो अशी जोरदार चर्चा आहे. मलिक यांना भाजपचा विरोध असून महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या मलिक यांच्यावर भाजपनेच जोरदार आरोप केले होते. त्यामुळे मलिक यांना अजित पवार गटात पाठवून एकप्रकारे भाजपला बदमान करण्याची संधी साधण्यासाठी पवारांनी जाणीवपूर्वक मलिकांना अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर बसण्याचे निर्देश दिले असतील,असे बोलले जात आहे. त्यामुळे मलिकांना पवार गटामध्ये स्वीकारुन महायुतीत समावून घेतल्यास भाजपची प्रतिमा मलिन करण्याची नामी संधी असल्यानेच मलिकांना सत्ताधारी बाकावर बसण्याचे निर्देश दिले असावेत असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. (MLA Nawab Malik)

(हेही वाचा – Shraddha Walkar Case : आफताब केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप नाहीच; मागतोय नवीन कपडे)

विरोधकांचे लक्ष विचलित करण्यासाठी

मात्र, मलिक यांनी काही दिवसांपूर्वीच आपण अजित पवार गटात असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. परंतु त्यानंतर भाजपने आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केली नव्हती. परंतु मलिकांचे हे कार्ड भाजपने अधिवेशनापर्यंत राखून ठेवले होते. आणि त्यामुळे अधिवेशनात मलिकांना सत्ताधारी बाकावर बसवून जाणीवपूर्वक विरोधकांना मलिकांच्या नावावर राजकारण करण्याची संधी देऊन एकप्रकारे अधिवेशनातील विरोधकांचे लक्ष विचलित करून एकप्रकारे मलिकांवर केंद्रीत करण्यासाठी फडणवीस यांनी ही रणनिती आखली असावी असेही बोलले जात आहे. त्यामुळे मलिकांवरच विरोधकांचे लक्ष केंद्रीत करून प्रसारमाध्यमांनाही मलिकांभोवतीच खिळवून ठेवण्याचा हा प्लॅन होता. त्यामुळेच फडणवीस यांनी यावर पत्र लिहून हा विषय अधिक चर्चेला आणला. जेणेकरून पहिले दोन दिवस विरोधकांना मलिक यांच्याशिवाय इतर विषयांवर जास्त लक्ष देता आले नाही,असेही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. (MLA Nawab Malik)

शरद पवार की देवेंद्र फडणवीस!

मात्र, या खेळीत मलिकांचा गेम केला असून मलिकांना अजित पवार गटात सामील होण्याचा मार्ग बंद झाला आणि ते पवार गटाकडे पुन्हा परतले जाणार आहे. त्यामुळे पवारांनी मलिक आपल्याच गटाकडे आहे हे सिध्द करण्यासाठी तसेच स्वीकारले तर भाजपला बदनाम करण्यासाठी खेळलेली खेळी होती,असे बोलले जात आहे. तर दुसरीकडे फडणवीस यांचीही यामागील खेळी होती, त्यात तेही यशस्वी ठरले असे बोलले जात आहे. त्यामुळे मलिकांना अधिवेशनात सत्ताधारी बाकावर बसवण्यामागे नक्की शरद पवार आहे की देवेंद्र फडणवीस आहेत याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. (MLA Nawab Malik)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.