Padgha-Borivali NIA Raid : एनआयएचे सिक्रेट ऑपरेशन ‘पडघा-बोरिवली’

एनआयएने इतर तपास यंत्रणांची मदतीने पडघा-बोरिवली या ठिकाणी राबविण्यात आलेल्या ऑपरेशनची तयारी मागील काही आठवड्यापासून सुरू होती.

436
Padgha NIA Raid : 'मजलीश'मध्ये पॅलेस्टाईन, इस्लाम धोक्यात या विषयावर होत होती चर्चा
Padgha NIA Raid : 'मजलीश'मध्ये पॅलेस्टाईन, इस्लाम धोक्यात या विषयावर होत होती चर्चा
  • मुंबई/संतोष वाघ

‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ अर्थात ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचे महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय असणाऱ्या पडघा-बोरिवली येथे शनिवारी एनआयए (NIA) (राष्ट्रीय तपास यंत्रणा) कडून सिक्रेट ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशन दरम्यान एनआयएने पडघा-बोरिवली गावातून इसिसच्या महाराष्ट्र मॉड्युलचा प्रमुख नेता साकीब नाचन याच्यासह १५ जणांना अटक करून त्यांना दिल्ली येथे नेण्यात आले आहे. (Padgha-Borivali NIA Raid)

या ऑपरेशन दरम्यान एनआयएने (NIA) साकीब नाचन (Sakib Nachan) आणि इतरांच्या घरातून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड, रिव्हॉल्वर, धारदार शस्त्रे, इसिस संबंधी कागदपत्रे, स्मार्ट फोन आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आल्याची माहिती एनआयएकडून (NIA) देण्यात आली. पडघा बोरिवली सह एनआयएने (NIA) राज्यातील पुणे कोंढवा, मिरारोड, ठाणे असे एकूण ४४ ठिकाणावर एकाच वेळी कारवाई केल्याचे एनआयए कडून सांगण्यात आले असले तरी तपास यंत्रणांकडून सर्वात मोठे ऑपरेशन पडघा-बोरिवली येथे राबविण्यात आले आहे. (Padgha-Borivali NIA Raid)

(हेही वाचा – NIA Raid : भिवंडीतील पडघासह राज्यात ४३ ठिकाणी एनआयएची छापेमारी, साकीब नाचनसह १५जण ताब्यात)

एनआयएने (NIA) इतर तपास यंत्रणांची मदतीने पडघा-बोरिवली या ठिकाणी राबविण्यात आलेल्या ऑपरेशनची तयारी मागील काही आठवड्यापासून सुरू होती. या ऑपरेशनची एनआयए, राज्य एटीएस आणि स्थानिक पोलिसांकडून गुप्तता पाळण्यात आली होती. पडघा-बोरिवली हे गाव इसिसच्या महाराष्ट्र मॉड्युल मुख्य ठिकाण बनले होते, या ठिकाणी शरिया कायद्याचे पालन केले जात होते, तसेच इसिस महाराष्ट्र मॉड्यूलचे सर्व सदस्य, पडघा-बोरिवली येथून कार्यरत होते अशी माहिती एनआयएच्या (NIA) तपासात समोर आल्यानंतर इसिसचे महाराष्ट्र मॉड्युल उध्वस्त करण्यासाठी एनआयएने (NIA) हे ऑपरेशन हाती घेतले होते. (Padgha-Borivali NIA Raid)

ठाणे ग्रामीण पोलीस, राज्य एटीएस यांच्या मदतीने हे ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी स्थानिक पोलिसांना एनआयएच्या (NIA) हाती लागलेली संशयितांच्या नावाची यादी देण्यात आली होती. या यादीनुसार संशयातावर व त्यांच्या हालचालीवर स्थानिक पोलीस आणि राज्य गुप्तचर विभागाकडून लक्ष ठेवण्यात आले होते. हे सर्व संशयित पडघा-बोरिवली येथे असल्याची खात्री झाल्यानंतर ऑपरेशन पडघा-बोरिवली हे शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पार पाडण्याचे ठरले. (Padgha-Borivali NIA Raid)

त्यानुसार सर्व यंत्रणा ना कामाला लावण्यात आले होते, ठाणे ग्रामीण पोलिसांनी जादा कुमक पडघा येथे शुक्रवारी रात्री मागविण्यात आली होती, मात्र या ऑपरेशनची भनक देखील त्यांना लागू दिली नाही. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पडघा पोलीस ठाण्याकडून काळजी घेण्यात आली होती, व शुक्रवारी मध्यरात्री पडघा-बोरिवली गावाला जवळपास ५०० पोलिसांचा वेढा टाकण्यात आला, बाहेरून गावात कुणालाही जाऊ दिले जात नव्हते. अखेर शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास एनआयए (NIA) आणि राज्य एटीएसच्या (ATS) अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह जवळपास ७० ते ७५ वाहने पडघा-बोरिवली गावात शिरली व त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने साकीब नाचन (Sakib Nachan) याच्या घरासह जवळपास ३५ ठिकाणांवर एकाच वेळी धाडसत्र सुरू केले. (Padgha-Borivali NIA Raid)

(हेही वाचा – NIA Raid : एनआयए ची मोठी कारवाई, ४४ ठिकाणी छापेमारी, १३ संशयित ताब्यात)

अचानक पडघा-बोरिवली गावात पोलिसांच्या या धाडसत्रामुळे खळबळ उडाली, अनेक संशयितांच्या घरातील महिलांनी या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु स्थानिक पोलिसांकडून तेथील परिस्थिती योग्यरीत्या हातळण्यात आली. एनआयए आणि इत तपास यंत्रणांनी साकीब नाचनसह १५ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या घरांची झडती घेऊन महत्वाचे पुरावे, रोकड, शस्त्रे, रिव्हॉल्वर, इसिस संबंधी कागदपत्रे, स्मार्ट फोन आणि इतर डिजिटल उपकरणे ताब्यात घेऊन ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांच्या कुटुंबांना कारवाई संबंधी माहिती देऊन संशयितांना पोलीस व्हॅनमध्ये टाकून दिल्ली येथे नेण्यात आले अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. (Padgha-Borivali NIA Raid)

एनआयएच्या तपासानुसार, अटक करण्यात आलेल्या साकीब नाचन (Sakib Nachan) सह इत संशयित त्यांच्या परदेशी हँडलरच्या निर्देशानुसार कार्यरत होते. आयएसआयएसचा हिंसक आणि विध्वंसक अजेंडा पुढे नेण्यासाठी, आयईडी बनविण्यासह विविध दहशतवादी कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी होते. एनआयएच्या तपासात पुढे असे समोर आले आहे की आरोपी, इसिस महाराष्ट्र मॉड्यूलचे सर्व सदस्य, पडघा-बोरिवली येथून कार्यरत होते, जिथे त्यांनी संपूर्ण भारतात दहशत पसरवण्याचा आणि हिंसाचार घडवून आणण्याचा कट रचला होता. (Padgha-Borivali NIA Raid)

हिंसक जिहाद, खिलाफत, इसिस इत्यादी मार्गाचा अवलंब करून, अटक आरोपींनी देशातील शांतता आणि सांप्रदायिक सलोखा बिघडवणे आणि भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी ठाण्यातील पडघा हे गाव ‘मुक्त क्षेत्र’ आणि ‘अल शाम’ म्हणून घोषित केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पडघा तळ मजबूत करण्यासाठी ते मुस्लिम तरुणांना त्यांच्या राहत्या ठिकाणाहून पडघा येथे स्थलांतरित होण्यास प्रवृत्त करत होते. मुख्य आरोपी साकीब नाचन (Sakib Nachan) हा इसिसचा महाराष्ट्र मॉड्यूलचा प्रमुख असून तो इसिस प्रतिबंधित संघटनेत सामील झालेल्या व्यक्तींना ‘बयथ’ (इसिस च्या खलिफाशी निष्ठेची शपथ) देखील देत होता. (Padgha-Borivali NIA Raid)

(हेही वाचा – Padgha NIA Raid : भिवंडीतील पडघा गाव एनआयए च्या रडारवर)

५ तास सुरू होते ऑपरेशन पडघा-बोरिवली

एनआयए कडून राबविण्यात आलेले ऑपरेशन पडघा-बोरिवली हे पहाटे ३वाजता सुरू झाले आणि सकाळी ८ वाजता संपले तब्बल ५ तास सुरू असलेल्या या ऑपरेशन दरम्यान तपास यंत्रणेच्या हाती महत्वाचे पुरावे आणि इसिस संबंधी कागदपत्रे तसेच डिजिटल गॅझेट लागले आहे. (Padgha-Borivali NIA Raid)

कारवाई नंतर गावात स्मशान शांतता

एनआयए (NIA) आणि इतर तपास यंत्रणेच्या कारवाई नंतर पडघा-बोरिवली गावात शुकशुकाट होता, एकाही घरातुन कोणीही बाहेर पडलेले नव्हते, संपूर्ण गावात पोलिसांशिवाय इतर कोणीही रस्त्यावर दिसत नव्हते. संपूर्ण पडघा-बोरिवली गावात स्मशान शांतता पसरली होती. या गावात येण्यावर पत्रकारांना देखील मज्जाव करण्यात आला होता. (Padgha-Borivali NIA Raid)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.