Student : देवगड समुद्रात सैनिकी शाळेतील सहा विद्यार्थी बुडाले

303
पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल देवगड येथे आली होती. तेव्हा काही विद्यार्थी (Student)  देवगड समुद्रात उतरले असताना त्यात सहा जण बुडाले. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात चार जणांचे मृतदेह सापडले. यातील एकाला वाचवण्यात यश आले आणि अद्याप एक जण बेपत्ता आहे.
प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिषा पडवळ, पायल बनसोडे अशी मृत झालेल्या चार व्यक्तींची नावे आहेत. तर आकाश तुपे याला वाचवण्यात यश आले आहे. राम डिचवलकर हा अद्यापही बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे. देवगड येथील समुद्र किनारा हा खोल नाही. हा पर्यटकांसाठी सुरक्षित किनारा म्हणून ओळख आहे. यामुळे अतिउत्साही पर्यटक जीव गमावून बसतात. काही जण खोल समुद्रात जातात आणि मग मोठ्या लाटांमध्ये अडकतात आणि बुडतात. सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सर्वात मोठी घटनाआतापर्यंत समुद्रात बुडून पर्यटकांचा मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, त्यातील सर्वात मोठी घटना म्हणून देवगडच्या या घटनेकडे पाहिले जाईल. आतापर्यंत तारकर्ली, देवबाग, शिरोडा, वेळागर येथे अशा घटना घडल्या आहेत. देवगड समुद्रात अशी पहिलीच मोठी घटना आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.