Rahul Shewale : ‘मविआ’तील भ्रष्टाचारामुळे सर्व लोकप्रतिनिधी त्रस्त – राहुल शेवाळे

विधानसभा अध्यक्षांसमोर नोंदवली साक्ष

356
Dharavi Redevelopment MP Shewale : उध्दव ठाकरेंचा धारावीच्या पुनर्विकासात खोडा, पण दादरकरांच्या घरांसाठी कधी काढणार मोर्चा खासदार शेवाळेंचा सवाल
Dharavi Redevelopment MP Shewale : उध्दव ठाकरेंचा धारावीच्या पुनर्विकासात खोडा, पण दादरकरांच्या घरांसाठी कधी काढणार मोर्चा खासदार शेवाळेंचा सवाल

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे आमचे सर्वच लोकप्रतिनिधी त्रस्त होते. त्यामुळे वारंवार त्यांच्याकडून राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्याची विनंती उद्धव ठाकरेंना केली जात होती. परंतु, त्यांना कधीच भेटण्यासाठी वेळ दिली गेली नाही, असा दावा खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी शनिवार, दि. ९ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांसमोर केला. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी त्यांची उलटतपासणी घेतली. (Rahul Shewale)

शिवसेना पक्षाच्या घटनेत ‘मुख्यनेता’ हे पद आहे का, असा सवाल ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी विचारला. शेवाळे यांनी त्याला ‘हो’ असे उत्तर दिले. त्यावर, ‘तुम्ही निवडणूक आयोगात जी घटना सादर केली, त्यात मुख्य नेता पद कुठे आहे ते दाखवा’, असे आव्हान कामत यांनी दिले. मात्र, ‘घटनेत दुरुस्ती करण्यात आली होती, त्यात मुख्य नेते पदाचा उल्लेख आहे’, असा दावा शेवाळे (Rahul Shewale) यांनी केला. (Rahul Shewale)

‘घटनेतील कथित दुरुस्ती २१ जून २०२२ नंतर करण्यात आली. त्यामुळे मुख्य नेता या बेकायदेशीर पदाला कोणतेही महत्त्व नाही, या कार्यवाहीत त्याचा कुठलाही संबंध येत नाही’, असे देवदत्त कामत शेवाळे यांना उद्देशून म्हणाले. त्यावर, हे साफ चुकीचे असल्याचा दावा राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी केला. (Rahul Shewale)

(हेही वाचा – Wrestling Federation of India: राष्ट्रीय कुस्ती महासंघाची निवडणूक डिसेंबरमध्ये, निकाल त्याच दिवशी लागणार)

‘त्या’ ठरावाला माझा पाठिंबा नव्हता!
  • २५ जून २०२२ रोजी शिवसेना भवनात जी राष्ट्रीय कार्यकारिणी झाली, तिला तुम्ही हजर होता का, असे देवदत्त कामत यांनी विचारले. त्याला ‘हो’ असे उत्तर शेवाळेंनी (Rahul Shewale) दिले; पण त्यावेळी जो ठराव मांडण्यात आला, त्याला माझा पाठिंबा नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. (Rahul Shewale)
  • तुमची शिवसेना संसदीय पक्षाचे गटनेते पदी निवड कधी झाली, तुमच्या आधी कोण गटनेता होता, असा सवाल कामत यांनी केला. विनायक राऊत, असे राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी दिले. त्यावर, ‘एकनाथ शिंदे यांना कुठल्याही शिवसेना लोकसभा सदस्याचा २० जून २०२२ आधी पाठिंबा नव्हता’, असा दावा कामत यांनी केला. मात्र, शेवाळे (Rahul Shewale) यांनी त्यावर आक्षेप नोंदवत, हे खरे नसल्याचा पुनरुच्चार केला. (Rahul Shewale)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.