- ऋजुता लुकतुके
एकदिवसीय विश्वचषकाचा प्रभाव आता खऱ्या अर्थाने मागे पडेल आणि सुरू होईल टी-२० (T20) ची लाट. (Ind vs SA T20 Series)
भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ (Ind vs SA) रविवारी दरबन इथं आमने सामने येतील तेव्हा एकदिवसीय विश्वचषकाचा प्रभाव खऱ्या अर्थाने ओसरलेला असेल. आता सुरू होईल टी-२० विश्वचषकाची तयारी आणि दोन्ही संघ आपल्याकडच्या युवा खेळाडूंच्या ताफ्याला परजण्याचा प्रयत्न करतील. (Ind vs SA T20 Series)
भारतासाठी हे आव्हान थोडसं वेगळं आहे. एकदिवसीय विश्वचषक चार वर्षातून एकदा येतो आणि भारतीय संघाने (Indian team) त्याची तयारी ३ वर्ष आधीच सुरू केली होती. शेवटच्या दोन वर्षांत तर ६६ खेळाडूंना संधी देऊन त्यातून सर्वोत्तम १५ जण भारताने विश्वचषकासाठी निवडले. खेळाडूंना आपल्या भूमिका चांगल्या पद्धतीने समजावून सांगितल्या आणि त्याचा परिणाम विश्वचषक स्पर्धेत दिसला. (Ind vs SA T20 Series)
आता परिस्थिती थोडी वेगळी आहे. टी-२० विश्वचषक जून महिन्यातच होणारए. म्हणजे भारतीय संघाकडे (Indian team) तयारीसाठी फक्त सहा महिने आहेत आणि त्यातही भारतीय संघ (Indian team) त्यापूर्वी आयपीएल सोडून फक्त ६ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. त्यामुळे इथून पुढे भारतासाठी जशी संघ उभारणीची प्रक्रिया आहे तसंच काही युवा खेळाडूंसाठी आपली चमक दाखवून देण्याचीही ही मोजकीच संधी आहे. (Ind vs SA T20 Series)
3️⃣Days To GO !
The much-anticipated 𝐅𝐫𝐞𝐞𝐝𝐨𝐦 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 gets underway this Sunday 🇿🇦🇮🇳
A series of 2️⃣ Titans honouring 2️⃣ global icons . It will all be decided on the battlefield 🏟
3️⃣ T20Is
3️⃣ ODIs
2️⃣ TestsShow your support for the Proteas with a 🇿🇦 in comments… pic.twitter.com/Ml4j9IwvDi
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 7, 2023
अशा वेळी भारतीय संघाची नजर असेल ती रिंकू सिंग (Rinku Singh) आणि जितेश शर्मा या युवा खेळाडूंवर. टी-२० संघात ईशान किशन आणि के एल राहुल असा यष्टीरक्षकांचा पर्याय आपल्याकडे आह. पण, जितेश चांगली कामगिरी करतोय आणि राहुल यष्टीरक्षण करणार नसेल किंवा ईशानचा समावेश नक्की नसेल तर जितेशचाही विचार नक्कीच होऊ शकतो. (Ind vs SA T20 Series)
तर रिंकू सिंगने (Rinku Singh) आपल्या तडाखेबंद फलंदाजीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत लक्ष वेधून घेतलं आहे. अलीकडच्या सहा सामन्यांत त्याची कामगिरी उजवी आहे. सहाव्या क्रमांकावरील कुठल्याही गोलंदाजांविरुद्ध हल्ला चढवणारा फलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जातंय. (Ind vs SA T20 Series)
अशावेळी पहिल्या टी-२० सामन्यातही रिंकू सिंगवर (Rinku Singh) नजरा रोखलेल्या असतील. पण, त्यासाठी त्याला आणि त्याच्या बरोबर यशस्वी जयसवाल आणि इतर फलंदाजांनाही दक्षिण आफ्रिकेतील कमी-अधिक उसळी असलेल्या खेळपट्ट्यांवर भक्कम फलंदाजी करावी लागेल. दक्षिण आफ्रिकेत वेगळा कस लागतो आणि तो कसलेल्या श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांचाही लागणार आहे. (Ind vs SA T20 Series)
(हेही वाचा – MLA Nawab Malik : मलिकांना सत्ताधारी बाकावर बसवण्याचा नक्की गेम कोणाचा?)
दुसरीकडे तेज गोलंदाजांना खेळपट्टीकडून नक्की साथ मिळेल. पण, फिरकी गोलंदाजांना तशी ती मिळणार नाही. त्यामुळे भारतीय संघ कुठल्या अकरा खेळाडूंना खेळवतो यावरही लक्ष असेल. अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांचाही कस लागणार आहे. तर अर्शदीप आणि मुकेश कुमार यांना दीर्घ पल्ल्याचे खेळाडू म्हणून पाहिलं जातंय. त्यांना आता कामगिरीने हे सिद्ध करावं लागेल. (Ind vs SA T20 Series)
दुसरीकडे आफ्रिकन संघाची परिस्थितीही काही वेगळी नाहीए. लुंगी एनगिडी संघातून बाहेर झालाय. तर कर्णधार बवुमाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. शिवाय क्विंटन डी कॉक खेळणार नाहीए. त्यामुळे आफ्रिकन संघाचीही घडी बसतेय. आणि मार्करमच्या नेतृत्वाखाली आफ्रिकन संघ कसा खेळतो हे पाहावं लागणार आहे. तेज गोलंदाज कोएटझीला शेन पोलॉकचा वारसदार म्हणून पाहिलं जात आहे. त्याच्या साठीही ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. (Ind vs SA T20 Series)
दोन्ही संघांसाठी टी-२० विश्वचषकाचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. (Ind vs SA T20 Series)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community