Viswanathan Anand: बुद्धिबळाचा सम्राट ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद

वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी आनंदने सहा गेमच्या सामन्यात अलेक्सी शिरोवचा पराभव केला.

1501
Viswanathan Anand: बुद्धिबळाचा सम्राट ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद
Viswanathan Anand: बुद्धिबळाचा सम्राट ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद

विश्वनाथन आनंद हे एक जगप्रसिद्ध आणि अद्भुत प्रतिभेचे बुद्धिबळ खेळाडू आहेत. ते पाच वेळा विश्वविजेते झाले आहेत. १९८८ मध्ये ते भारताचे पहिले ग्रॅंडमास्टर झाले. त्यांनी २८०० ची ईलो रेटिंग पार केली आहे. २०२२ मध्ये ते इंटरनॅशनल चेस फेडरेशनचे उपाध्यक्षदेखील झाले. (Viswanathan Anand)

विश्वनाथ आनंद अतिशय संयमी खेलाडू आहेत आणि आपल्या बुद्धिचा वापर करुन ते समोरच्या खेळाडूला चूक करण्यास भाग पाडतात आणि त्याच्यावर विजय मिळवतात. इतकी क्षमता त्यांच्या खेळात आहे.

विश्वनाथन आनंद यांचा जन्म ११ डिसेंबर १९६९ रोजी तामिळनाडू येथील मथिलाडुथराइ येथे झाला. मात्र त्यांचे बालपण चेन्नईत गेले. त्यांचे वडील विश्वनाथन अय्यर रेल्वेमध्ये व्यवस्थापक होते तर आई सुशीलादेवी बुद्धिबळ प्रशिक्षक होती. बुद्धिबळाचा वारसा त्यांना आईकडूनच लाभला. त्यांच्या आईने त्यांना ते ६ वर्षांचे असल्यापासून बुद्धिबळाचे धडे द्यायला सुरुवात केली. तेव्हापासूनच त्यांची कारकीर्द निश्चित झाली.

२००० FIDE वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी आनंदने सहा गेमच्या सामन्यात अलेक्सी शिरोवचा पराभव केला. २००२ पर्यंत ही चॅम्पियनशिप आनंद यांनी आपल्या बुद्धिच्या बळावर स्वतःकडे राखून ठेवली. २००७ मध्ये निर्विवादपणे विश्वविजेता झाले आणि २००८ मध्ये व्लादिमीर क्रॅमनिक, २०१० मध्ये वेसेलिन टोपालोव आणि २०१२ मध्ये बोरिस गेल्फँड यांना हरवून आपली विजयाची घोडदौड सुरूच ठेवली.

विशेष म्हणजे २००६ मध्ये क्रॅमनिक, टोपालोव्ह आणि गॅरी कास्पारोव्ह यांच्यानंतर, FIDE रेटिंग यादीत २८०० ईलोचा टप्पा पार करणारे विश्वनाथन आनंद इतिहासातील चौथे खेळाडू ठरले. त्यांची कामगिरी अशी की, त्यांनी २१ महिन्यांपर्यंत प्रथम क्रमांक टिकवून ठेवला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.