LIC Jeevan Utsav : एलआयसीच्या नवीन जीवन उत्सव योजनेतून मिळतात ‘हे’ दोन फायदे

एलआयसीने १ डिसेंबरपासून आपली नवीन पारंपरिक विमा योजना लाँच केली आहे जिचं नाव आहे जीवन उत्सव. 

462
lic aao salary : LIC AAO ला किती असतो पगार? आणि काय असतं त्यांचं काम?
  • ऋजुता लुकतुके

एलआयसीने (LIC) १ डिसेंबरपासून आपली नवीन पारंपरिक विमा योजना लाँच केली आहे जिचं नाव आहे जीवन उत्सव. (Jeevan Utsav) (LIC Jeevan Utsav)

जीवन बीमा निगम (Life Insurance Corporation) अर्थात, एलआयसीने (LIC) डिसेंबरमध्ये त्यांची नवीन विमा योजना सुरू केली आहे. जीवन उत्सव (Jeevan Utsav) असं तिचं नाव असून ही योजना अल्पावधीतच लोकांमध्ये यशस्वी झाली आहे. तिच्या जोरावरच भारतीय ग्राहकांनी एलआयसीच्या (LIC) समभागांनाही मागच्या आठवड्यात मोठा प्रतिसाद दिला आणि याचं पर्यवसान एलआयसीच्या (LIC) समभागांत १० टक्क्यांनी वाढ होण्यात झालं. तर एलआयसी (LIC Company) कंपनीचं बाजार भांडवलही पुन्हा एकदा ५ लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचलं. (LIC Jeevan Utsav)

इतकं यश या शेअर बाजाराशी संलग्न नसलेल्या योजनेनं एलआयसीला (LIC) अल्पावधीत मिळवून दिलं आहे. या योजनेविषयी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. (LIC Jeevan Utsav)

जीवन उत्सव (Jeevan Utsav) ही निवृत्ती काळातील आर्थिक नियोजनासाठी मदत करणारी योजना आहे. ही योजना नॉन लिंक्ड आणि नॉन पार आहे. म्हणजेच इथं गुंतवलेले पैसे शेअर बाजारात गुंतवले जात नाहीत. या योजनेत तुम्हाला अंतरिम लाभांश किंवा वर्षभरात कुठलाही अतिरिक्त लाभ मिळत नाही. पैसे योजनेची मुदत संपल्यावर एकमार्गी तुमच्याकडे जमा होतात. (LIC Jeevan Utsav)

योजनेची मुदत संपल्यावर तुम्हाला दोन प्रकारे यातून परतावा मिळवता येतो. हे दोन पर्याय आहेत, नियमित मिळकत (Regular Income Benefit) आणि फ्लेक्झी इनकम बेनिफिट (Flexi Income Benefit). (LIC Jeevan Utsav)

रेग्युलर इनकम बेनिफिट (Regular Income Benefit)  अंतर्गत, योजनेची मुदत संपल्यावर विमाधारकाला गुंतवलेल्या रकमेवर जी किमान रकमेची हमी दिली गेली असेल त्या रकमेच्या १० टक्के रक्कम दरवर्षी दिली जाईल. (LIC Jeevan Utsav)

तर फ्लेक्झी इनकम बेनिफिट (Flexi Income Benefit) अंतर्गत, विमाधारकाला किमान हमी रकमेच्या दहा टक्के रक्कम दरवर्षी काढून घेता येईल. पण, ती कधी आणि कशी घ्यायची याची निवड करण्याचा अधिकार विमाधारकाला असेल. (LIC Jeevan Utsav)

(हेही वाचा – Pune: पुणे ते लोणावळा १० डिसेंबरला मेगाब्लॉक, कोणत्या उपनगरीय गाड्या रद्द; जाणून घ्या…)

विमा योजनेच्या मुदतीत दुर्दैवाने विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नामांकित व्यक्तीला एकूण भरलेल्या प्रिमिअमपेक्षा १०५ टक्के जास्त रकमेची हमी असेल. योजनेची मुदत पूर्ण झाली असल्यास योजना सुरू होताना मृत्यूनंतर देय रक्कम जी मान्य झाली असेल तेवढी रक्कम जवळचे नातेवाईक किंवा नामांकन झालेल्या व्यक्तीला मिळतील. मृत्यूनंतर देय रकमेत मुदतीच्या कालावधीत जमा झालेले इतर भत्तेही जमा केले जातील. (LIC Jeevan Utsav)

वयाचे ९० दिवस पूर्ण केलेली कुठलीही व्यक्ती जीवन उत्सव योजना (Jeevan Utsav Yojana) घेऊ शकते. वयाची कमाल मर्यादा ६५ वर्षांची आहे आणि योजनेची मुदत ५ ते १६ वर्षे इतकी आहे. (LIC Jeevan Utsav)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.