Traffic congestion: दिवा शहरातील वाहतूक कोंडी सुटली नाही तर रस्त्यावर उतरून सोडवू, मनसेचा इशारा

नवी मुंबई, डोंबिवली आणि ठाण्यावरून येणाऱ्या बसेसमुळे मोठी वाहतूक कोंडी होते.

249
Traffic congestion: दिवा शहरातील वाहतूक कोंडी सुटली नाही तर रस्त्यावर उतरून सोडवू, मनसेचा इशारा
Traffic congestion: दिवा शहरातील वाहतूक कोंडी सुटली नाही तर रस्त्यावर उतरून सोडवू, मनसेचा इशारा

दिवा शहरातील दिवा चौकात (Traffic congestion) नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होते. विशेषतः गर्दीच्या वेळेत सायंकाळी ७ ते रात्री ९ या काळात तर इथे तासभर वाहनांच्या रांगा लागतात. दिवा स्थानकाकडून शीळ फाटा आणि आगासन कडे जाणारी व येणारी वाहने या चौकात येऊन कोंडीत अडकतात. त्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसाच्या नेमणुकीची मागणी दिवा मनसेने केली आहे.

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस उपलब्ध असल्यास दिवा चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीला चाप बसेल, असेही मनसेने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे तसेच वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियमन होत नसेल, तर मनसेचे महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरतील आणि दिवा चौकातील वाहतूक कोंडीचे नियमन करतील, असा इशारा मनसेने निवेदनाद्वारे दिला आहे.

(हेही वाचा – Israel-Hamas conflict: संयुक्त राष्ट्र परिषदेत गाझामधील तात्काळ युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळला )

दिव्यातील चौकात दिवा स्थानकातून, शीळ मार्गावरून, आगासन- बेडेकर नगरवरुन रिक्षा, दुचाकी तर चारचाकी येतात. अन् त्याचवेळी त्या चौकात नवी मुंबई, डोंबिवली आणि ठाण्यावरून येणाऱ्या बसेसमुळे मोठी वाहतूक कोंडी होते, तर तेथे सायंकाळच्या वेळी वाहतूक पोलीस उपलब्ध नसल्याने कोणीही कशाही गाड्या दामटवून संपूर्ण वाहतुकीचा बोजवारा उडवून देतात. याला आळा घालण्यासाठी मनसेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.