Local Megablock : रविवारी प्रवासाचे नियोजन करताय; तर ‘ही’ बातमी वाचाच…

246
Local Train Megablock : जाणून घ्या कुठल्या मार्गावर कसा असणार ‘ब्लॉक’

रविवार, १० डिसेंबर रोजी तुम्ही प्रवासाचे नियोजन करत असाल तर आधी तुम्हाला उपनगरीय रेल्वेच्या मेगाब्लॉकचे (Local Megablock) नियोजन पहावे लागणार आहे. कारण मुंबई लोकलच्या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक (Megablock) घेतला जाणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०९.३० ते दुपारी २.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबून आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशिराने पोहचतील.

सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त वळवण्यात येतील आणि दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुढे मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशिराने पोहचतील.

(हेही वाचा National Investigation Agency: दहशत पसरवणाऱ्या १५ जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक, धाडसत्रात जप्त केल्या ‘या’ वस्तू …वाचा सविस्तर)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणार्‍या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.

कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक (Local Megablock) कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि कुर्ला तसेच  पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.