Jasuben Shilpi : भारताची कांस्य महिला जसुबेन शिल्पी

जसुबेन शिल्पी यांनी आपल्या जीवनात सुमारे ५२५ अर्ध पुतळे आणि २२५ मूर्तींची निर्मिती केली आहे.

244

जसुबेन शिल्पी (Jasuben Shilpi) भारतीय कांस्य शिल्पकार होत्या. त्यांनी आपल्या जीवनात सुमारे ५२५ अर्ध पुतळे आणि २२५ मूर्तींची निर्मिती केली आहे. त्यांना (Jasuben Shilpi) भारताची कांस्य महिला देखील म्हटले जाते. १० डिसेंबर १९४८ रोजी गुजरातमध्ये जन्मलेल्या जसुबेन (Jasuben Shilpi) यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ७०० हून अधिक शिल्पे बनवली आहेत आणि त्यांची शिल्पे केवळ भारतातच नव्हे तर बाहेरील अनेक देशांमध्ये स्थापित आहेत. (Jasuben Shilpi)

त्यांच्या मूर्ती निर्माण कार्यांमध्ये महात्मा गांधी, राणी लक्ष्मीबाई, स्वामी विवेकानंद आणि वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांचाही समावेश आहे. त्यांनी बनवलेले पुतळे तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, राजस्थान, बिहार, उत्तराखंड अशा भारतातील विविध राज्यांमध्ये स्थापित करण्यात आले आहेत. त्यांनी अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशनशी करार करून शहरातील विविध पुतळे बनवले. (Jasuben Shilpi)

(हेही वाचा – Traffic congestion: दिवा शहरातील वाहतूक कोंडी सुटली नाही तर रस्त्यावर उतरून सोडवू, मनसेचा इशारा)

२००५ मध्ये ‘झाशीची राणी’ चा पुतळा निर्माण केल्याबद्दल त्यांचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये (Limca Book of Records) नोंदवले गेले. याशिवाय त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे. जसे की द मिरॅकल्स वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट, वुमन ऑफ द इयर, अब्राहम लिंकन आर्टिस्ट अवॉर्ड-यूएसए इ. (Jasuben Shilpi)

राजस्थान जोधपूर (Rajasthan Jodhpur) येथे देशातील सर्वात मोठी हनुमानाची कांस्य मूर्ती बनवण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. त्यांना (Jasuben Shilpi) देशासाठी कांस्य संग्रहालय स्थापन करायचे होते. मात्र त्याआधीच त्यांनी या जगातून एक्झिट घेतली. १४ जानेवारी २०१३ रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने जसुबेन (Jasuben Shilpi) यांचे निधन झाले. (Jasuben Shilpi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.