केंद्रीय तपास यंत्रणा ‘एनआयए’ने भिवंडीतील पडघा – बोरिवली (Padgha-Borivali) येथे करण्यात आलेल्या छापेमारीत अटक करण्यात आलेल्या १५ दहशतवाद्यांपैकी काही जणांकडे हमास देशाचे ध्वज (झेंडे), एक पिस्तुल, दोन एअर गन, आठ तलवारी सह दोन लॅपटॉप, ६ हार्डडिक्स,तीन सीडी, ३८ मोबाईल फोन, १० मॅगजीन बुक्स, ६८लाख ३ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
एनआयएच्या पथकांनी शनिवारी पहाटे भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली,(Padgha-Borivali) ठाणे, मीरा रोड आणि पुणे आणि कर्नाटकातील बेंगळुरू सह तब्बल ४४ ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली होती. यापैकी सर्वात मोठी कारवाई पडघा-बोरिवली येथे करण्यात आली असून इसिस या दहशतवादी संघटनेचा महाराष्ट्र मॉड्युल चा प्रमुख नेता मोहम्मद साकीब अब्दुल हमीद नाचन उर्फ रविश उर्फ साकीब उर्फ खालिद याच्या सह हसीब झुबेर मुल्ला उर्फ हसीब झुबेर मुल्ला, काशिफ अब्दुल सत्तार बलेरे, सैफ अतीक नाचन, रेहान अशफाक सुसे, शगाफ सफिक दिवकर, फिरोज दस्तगीर कुवारी, आदिल इलियास खोत, फिरोज दस्तगीर ,रफील अब्दुल लतीफ नाचन, याह्या रवीश खोत, रझील अब्दुल लतीफ नाचन, फरहान अन्सार सुसे, मुखलिस मकबूल नाचन आणि मुन्झीर अबुबकर कुन्नाथपीडीकल असे एकूण १५ जणांना अटक करण्यात आली आहे, अटके करण्यात सर्व आरोपी मूळचे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील असल्याची माहिती एनआयएच्या प्रवक्त्यानी दिली आहे.
(हेही वाचा-Jasuben Shilpi : भारताची कांस्य महिला जसुबेन शिल्पी)
एनआयएच्या छापेमारी दरम्यान (Padgha-Borivali) एनआयएला आदिल खोत याच्या ताब्यात हमास देशाचे ध्वज (झेंडे) सापडले, तर फिरोज दस्तगीर कुवान, रझील अबक्सुल नाचन, झीशान एजाज मुल्ला आणि मुखलिस मकबूल नाचन यांच्याकडून पिस्तुल, चाकू आणि तलवारी ही शस्त्रे जप्त करण्यात आली. सैफ अतीक नाचन, रेहान अशफाक सुसे आणि आतिफ नासीर मुल्ला यांच्याकडून ६८ लाख ३ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
साकीब नाचन हा २००३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी असून त्याला दहा वर्षांची शिक्षा कापून २०१७मध्ये साकीब हा तुरुंगातून बाहेर आला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याच्या देशविरोधी कारवाया सुरूच होत्या त्यात त्याने इसिस या दहशतवादी संघटनेत प्रवेश करुन इसिस चा महाराष्ट्र मॉड्युलचा प्रमुख बनला होता.पडघा -बोरिवली (Padgha-Borivali) येथे इसिसचे महाराष्ट्र मॉड्युलचे मुख्य कार्यालय करण्यात आले होते.अटक करण्यात आलेले इसिस महाराष्ट्र मॉड्यूलचे सर्व सदस्य, पडघा-बोरिवली येथून कार्यरत होते, जिथे त्यांनी संपूर्ण भारतात दहशत आणि हिंसाचार पसरवण्याचा कट रचला होता.
Join Our WhatsApp Community