राज्यातील काही भागात (Weather Update) थंडीची चालूल लागली आहे तर दुसरीकडे अजूनही काही भागात पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यात थंडी आणि पावसाचा खेळ रंगणार आहे.
सविस्तर माहितीनुसार, भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Weather Update) सुरु आहे. याचाच परिणाम महाराष्ट्र राज्यावरही झालेला दिसून येत आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इतर काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे.
(हेही वाचा – Padgha-Borivali : पडघा- बोरिवली येथे छापेमारीत ‘हमास’ चे झेंडे जप्त )
लवकरच कडाक्याची थंडी पडणार
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार काही शहरात पाऊस पडण्याची (Weather Update) शक्यता आहे तर पुढील काही दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी पडणार आहे. वातावरणातील हा सर्व बदल मिचॉन्ग चक्रीवादळामुळे होत असल्याचे हवामान खात्याने सांगितलं आहे.
देशातील ‘या’ भागात पावसाची शक्यता
हवामान खात्याने वर्तवलेल्या माहितीनुसार केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप, कर्नाटक या भागात हलका पाऊस पडणार आहे. तर पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि ईशान्य भारतात मध्यम ते दाट धुके पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Weather Update)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community