सामाजिक जबाबदारी कायदेशीररित्या बंधनकारक असलेल्या कोणत्याही कर भरण्यापेक्षा वेगळी आहे. जेव्हा आपण कोणताही कर भरतो तेव्हा समाज आपल्याशी जोडला जात नाही. देशाच्या,समाजाच्या कल्याणासाठी मदत करतो तेव्हा अनेक व्यक्ती, समाज आपल्याशी जोडला जातो. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्राने स्वयंप्रेरणेने देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन (Rajnath Singh) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्डस् वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार,द सीएसआर जर्नल एक्सलन्सचे अमित उपाध्याय, प्रसिद्ध कवी कुमार विश्वास,माजी केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. (Rajnath Singh)
(हेही वाचा – Chhagan Bhujbal : मराठा समाजाला दिले ते सर्व ओबीसींना द्या)
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले, “मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. परस्पर अवलंबिताची बंधने तोडून राहू शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या अडचणीवेळी मदत केली तर मदत करणाऱ्या व्यक्तीकडे किती संपत्ती आहे हे पहिले जात नाही. तर कोणत्या व्यक्तीने तातडीने मदत केली हेच पाहिले जाते. समाजात बंधुत्वाची,आणि मदतीची भावना असायला हवी.
The Corporate sector must rise above compulsory obligations & make voluntary contributions for the nation’s upliftment: Raksha Mantri Shri @rajnathsingh https://t.co/KvxuW8HMYq pic.twitter.com/IHra05MU21
— Rajnathsingh_in (@RajnathSingh_in) December 10, 2023
जो समाज एकमेकांना (Rajnath Singh) मदत करतो तोच समाज देशाला पुढे घेऊन जातो आणि इतरांना पुढे येण्यासाठी सुद्धा प्रेरित करतो. त्यासाठी सामाजिक जाणीव असलेल्या लोकांचे, विशेषत: कॉर्पोरेट्स क्षेत्रातील व्यक्ती, संस्था यांच्या सामजिक योगदानाबद्दल कौतुकच केले पाहिजे.असेही राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community