Bhagwant Mann Allegations : पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर मुलीचे गंभीर आरोप; ते दारू पितात आणि…

Seerat Kaur : माझे वडील दारू पितात आणि गुरुद्वाराला जातात. ते त्यांच्या तिसऱ्या मुलाची तयारी करत आहेत, असे आरोप भगवंत मान यांची मुलगी सीरत कौर यांनी केले आहेत.

360
Bhagwant Mann Allegations : पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर मुलीचे गंभीर आरोप; ते दारू पितात आणि...
Bhagwant Mann Allegations : पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर मुलीचे गंभीर आरोप; ते दारू पितात आणि...

आपचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann Allegations) हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दारूच्या नशेत गुरुद्वारात गेल्याचा त्यांच्यावर यापूर्वी आरोप होता. आता तसेच आरोप मान यांच्या मुलीनेही त्यांच्यावर केले आहेत. पंजाबचे (Punjab CM) मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कन्या सीरत कौर (Seerat Kaur) यांनी आपल्या वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत.

“माझे वडील दारू पितात आणि गुरुद्वाराला जातात. ते त्यांच्या तिसऱ्या मुलाची तयारी करत आहेत. या संदर्भात सीरत कौर यांनी एक व्हिडिओही तयार केला आहे. व्हिडिओमध्ये सीरत कौर (Seerat Kaur) यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. भगवंत मान यांनी तिची आणि तिच्या भावाची जबाबदारी घेण्यास नकार दिल्याचा आरोप सिरत यांनी केला आहे.

(हेही वाचा – Human Rights Day : १० डिसेंबर – मानव अधिकार दिन का साजरा केला जातो?)

व्हिडिओमध्ये सीरत यांनी विचारले की, जर एखादी व्यक्ती पालकांच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकत नसेल, तर त्याला पंजाब चालवण्याची जबाबदारी कशी सोपवली जाऊ शकते ?” सीरत कौर म्हणाली की, तिचे वडील तिसऱ्या मुलाचे वडील होणार आहेत. मान यांची एक पत्नी डॉ. गुरप्रीत कौरने तिला आणि तिच्या भावाला बाजूला केले आहे. डॉ. गुरप्रीत कौर गर्भवती आहे. (Bhagwant Mann Allegations)

“ज्या व्यक्तीने आपल्या दोन लहान मुलांना सोडून दिले आहे, त्याला तिसरे मूल का हवे आहे ? मी स्वत:ला वडिलांच्या नावापासून वेगळे केले आहे”, असे आरोप सीरत (Seerat Kaur) यांनी केले आहेत. ”जे आपल्या मुलांची काळजी घेऊ शकत नाहीत, त्यांच्यावर राज्याच्या हितासाठी काम करण्यासाठी विश्वास ठेवला जाऊ शकत नाही”, असे भाजप नेते बिक्रम सिंग मजिठिया यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – Allahabad High Court Bollywood Notice : अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना मिळाली नोटीस; जाणून घ्या नेमके कारण काय ?)

याआधी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीनेही (SGPC) भगवंत मान यांच्यावर आरोप केले होते. पंजाबचे मुख्यमंत्री (Punjab CM) आणि आम आदमी पक्षाचे (AAP) नेते भगवंत मान यांनी बैसाखीच्या निमित्ताने तख्त दमदमा साहिबमध्ये मद्यपान करून प्रवेश केला होता. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणीही SGPC ने केली. गुरुद्वाराला भेट देतांना मुख्यमंत्र्यांनी मूलभूत नियमांचे पालन केले नाही, असे एसजीपीसीचे सरचिटणीस करनैल सिंग पंजोली यांनी सांगितले. करनैल सिंग पंजोली (Colonel Singh Panjoli) म्हणाले होते की, जर मान मद्यपान थांबवू शकत नसतील, तर त्यांनी गुरुद्वारामध्ये येणे टाळले पाहिजे. (Bhagwant Mann Allegations)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.