Central Railway: कसारा-इगतपुरी स्थानकादरम्यान मालगाडी रुळावरून घसरली, मुंबईतील वाहतूक विस्कळीत

इगतपुरी ते कसारा अप सेक्शनवरील वाहतुकीवर परिणाम झालेला नाही,

254
Central Railway: कसारा-इगतपुरी स्थानकादरम्यान मालगाडी रुळावरून घसरली, मुंबईतील वाहतूक विस्कळीत
Central Railway: कसारा-इगतपुरी स्थानकादरम्यान मालगाडी रुळावरून घसरली, मुंबईतील वाहतूक विस्कळीत

कसारा-इगतपुरी स्थानकादरम्यान (Central Railway) मालगाडी रुळावरून घसरली. रविवारी, (१० डिसेंबर) सायंकाळी ६.३१ वाजता कसारा ते टीजीआर-३ डाऊन लाईन सेक्शनवर मालगाडी रुळावरून घसरली, मात्र या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत एकूण ७ कंटेनर वॅगन रुळावरून घसरल्या. यामुळे मुंबईहून सुटणाऱ्या मेल एक्सप्रेस खोळंबल्या आहेत.

मालगाडीचे ७ डबे रुळावरून घसरल्यामुळे कासारा ते इगतपुरी मार्गावरील मेल एक्स्प्रेसच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे इगतपुरी ते कसारा अप सेक्शनवरील वाहतुकीवर परिणाम झालेला नाही, ती कार्यरत आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Sanjay Raut : संजय राऊत यांच्या गाडीवर फेकली चप्पलने भरलेली पिशवी; समर्थन करत कार्यकर्ता म्हणाला…)

कल्याण स्टेशन रोड ए. आत र. टी. (अॅक्सिडंट रिलीफ ट्रेन) आणि इगतपुरी स्टेशन रेल ए. आर. टी. (अॅक्सिडंट रिलीफ ट्रेन) यांना आदेश देण्यात आले आणि अपघातस्थळी पाठवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोणत्या मेल एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम 
– कसाऱ्यावरून इगतपुरीच्या दिशेनं जाताना टीजीआर ३ हे स्थानक आहे. यामुळं ७ ट्रेनवर परिणाम झाला आहे.
– ११४०१ सीएसएमटी आदिलाबाद नंदिग्राम एक्स्प्रेस हीओम्बरमाली स्थानकात थांबवण्यात आली आहे.
– १२१०५ सीएसएमटी गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस ही घाटकोपर स्थानकात थांबवण्यात आली आहे.
– १२१०९ सीएसएमटी मनमाड पंचवटी एक्स्प्रेस विक्रोळी स्थानकात थांबवण्यात आली आहे.
– १७६१२ सीएसएमटी नांदेड एक्स्प्रेस सीएसएमटीहून निघाली आहे.
– १२१३७ सीएसएमटी फिरोजपूर पंजाब मेल एक्स्प्रेस सीएसएमटीहून निघाली आहे.
– १२१७३ एलटीटी प्रतापगड एक्स्प्रेस कसारा स्थानकात थांबवण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.