Nagpur Winter Session 2023 : अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा मुद्दा गाजणार ?

पहिले दोन दिवस अधिवेशनाला अनुपस्थिती लावलेले ठाकरे पिता - पुत्र आज उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता या पिता - पुत्राची जोडी सरकारला कोणत्या मुद्द्यावर अडचणीत आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

153
Nagpur Winter Session 2023 : अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा मुद्दा गाजणार ?

गुरुवार ७ डिसेंबरपासून नागपूर येथे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला (Nagpur Winter Session 2023) सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्ष उत्सुक तर विरोधी पक्ष काहीसे कमी आक्रमक जाणवले. दरम्यान अधिवेशनाचे पहिले दोन दिवस नवाब मलिक यांनी घेतलेली भूमिका आणि त्या भूमिकेला फडणवीसांनी दर्शवलेला विरोध मुद्द्यांमुळे गाजले. त्यामुळे आज म्हणजेच सोमवार ११ डिसेंबर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी कोणते मुद्दे गाजणार याची चर्चा रंगताना दिसत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजेच अधिवेशनाच्या (Nagpur Winter Session 2023) तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि विधिमंडळावर धडकणारे वेगवेगळे मोर्चे हे मुद्दे गाजणार आहेत.

(हेही वाचा – Halal Ban: उत्तर प्रदेशात हलाल बंदी; महाराष्ट्रात कधी?)

अवकाळीचा मुद्दा गाजणार

मागील काही महिन्यांपासून राज्यातील वातावरणात सतत बदल होत आहे. अशातच चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाचं संकट राज्यावर ओढवलं आहे. याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. शेतात आलेली पिकं या अवकाळी पावसामुळे वाहून गेली आहेत. अशातच आता शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा विषय अधिवेशनात गाजणार आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या चर्चेची मागणी केली होती. त्यानुसार आज या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. विधानसभा (Nagpur Winter Session 2023) अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या चर्चेचा निर्णय देणार आहेत.

(हेही वाचा – Middle Vaitarna Dam : मध्य वैतरणा प्रकल्प : कंत्राटदाराला व्याजासह द्यावे लागले सुमारे ३० कोटी रुपये)

ठाकरे पिता – पुत्र सरकारला अडचणीत आणणार ?

अशातच पहिले दोन दिवस अधिवेशनाला अनुपस्थिती लावलेले ठाकरे पिता – पुत्र (उद्धव ठाकरे – आदित्य ठाकरे) आज उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता या पिता – पुत्राची जोडी सरकारला कोणत्या मुद्द्यावर अडचणीत आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Nagpur Winter Session 2023)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.