Sharad Pawar: कांदा निर्यात बंदीविरोधात थेट शरद पवार मैदानात, चांदवडमध्ये रास्ता रोको आंदोलनाला उपस्थित

कांदा उत्पादकांनी केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या नाशिकमधील घराबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं.

189
Sharad Pawar: कांदा निर्यात बंदीविरोधात थेट शरद पवार मैदानात, चांदवडमध्ये रास्ता रोको सभा
Sharad Pawar: कांदा निर्यात बंदीविरोधात थेट शरद पवार मैदानात, चांदवडमध्ये रास्ता रोको सभा

केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातली आहे. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतलाय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. सोमवारी, ११ डिसेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीत चांदवडमध्ये रास्ता रोको आणि सभा होणार आहे. या आंदोलनाला खुद्द शरद पवार उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संतप्त आहेत.

कांदा प्रश्नावर सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नाशिकमधील व्यापारी या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्राने कांदा निर्यात बंदी केल्याने जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद होते. कांदा उत्पादकांनी केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या नाशिकमधील घराबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं. मंत्री पियुष गोयल, नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी शुक्रवारी दिली होती. त्यामुळे या बैठकीत कांदा प्रश्नावर काय तोडगा निघतो हेही पहाणं महत्त्वाचं असणार आहे.

(हेही वाचा – Mumbai Local: लोकलमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ४ वर्षांनी मिळाली शिक्षा )

कांदा लिलाव पूर्ववत होणार
नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव आजपासून पूर्ववत होणार आहे. केंद्र सरकारच्या निषेधार्थ कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. त्यातच पहिल्याच दिवशी म्हणजे शनिवार 9 डिसेंबर रोजी व्यापाऱ्यांमध्ये फूट पडली होती. नाशिकमधील पिंपळगाव आणि विंचूर बाजारसमितीमध्ये लिलाव सुरू होणार आहे. जे व्यापारी सलग तीन दिवस लिलाव बंद ठेवतील त्यांचे परवाना रद्द करण्याचा सहकार विभागाने इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर कांदा लिलाव पुन्हा सुरु होणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.