Article 370 हटवणे वैधच; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमुर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या घटणापीठाने हा निकाल दिला आहे.

584
Article 370 हटवणे वैधच; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

आज म्हणजेच सोमवार ११ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने घेतलेला कलम ३७० (Article 370) हटवण्याचा निर्णय हा वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले आहे. केंद्र सरकारचा कलम ३७० हटवणे हा निर्णय योग्यच असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.

काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय ?

कलम ३७० हटवण्याच्या (Article 370) सरकारच्या निर्णयावर अंतिम निकाल देतांना न्यायालयाने सांगितले की, जम्मू काश्मीरच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी कलम ३७० वर कोणताही आदेश जारी करणे आवश्यक नाही. केंद्र सरकारने कलम ३७० रद्द करून जम्मू आणि काश्मीरला उर्वरित भारताशी जोडण्याची प्रक्रिया मजबूत केली आहे. त्यामुळे कलम ३७० हटवणे हा निर्णय वैध असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

(हेही वाचा – Nagpur Winter Session 2023 : अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा मुद्दा गाजणार ?)

नेमकं प्रकरण काय ?

केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू – काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे घटनेतील कलम ३७० (Article 370) रद्द केले. त्यामुळे राज्याची जम्मू – काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांत विभागणी केली होती. याच प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात २ ऑगस्टपासून युक्तिवाद (Article 370) सुरू झाला होता. या युक्तिवादाचा आज अखेर निकाल लागला.

(हेही वाचाArticle 370 Hearing In SC : जम्मू आणि काश्मीरला पुन्हा स्वतंत्र राज्याचा दर्जा बहाल करणार – केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन)

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमुर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या घटणापीठाने हा निकाल दिला आहे. (Article 370)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.