सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचा भव्य ‘हल्लाबोल’ मोर्चा आज सोमवारी ११ डिसेंबर ला नागपूर विधानभवनावर धडकणार आहे. विदर्भातील नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. तर दुसरीकडे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आमदारांना सभागृहात राहून विरोध करण्यास सांगितले असल्याने काँग्रेसचे आधे इधर जाओ आधे उधर जाओ अशी अवस्था झाली आहे.
मोर्च्यात काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, माजी मंत्री, आमदार, खासदार, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, विविध सेल व विभागाचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. परंतू त्यातही विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काही आमदारांना सभागृहात उपस्थित राहायचे आदेश दिल्यामुळे काँग्रेस आमदारांमध्ये संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.
(हेही वाचा-Ind vs SA T20 Series : मार्करम आणि सुर्यकुमार यांनी जेव्हा फ्रीडम मालिकेच्या चषकाचं अनावरण केलं )
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह इतर मुद्दयावर काँग्रेस (Congress) पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात विधिमंडळावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहे. दीक्षाभूमी येथून हा मोर्चा निघेल आणि विधिमंडळाजवळ त्याचे सभेत रूपांतर होईल. याशिवाय, धनगर आरक्षण मोर्चा, आदिवासी मोर्चा यासह अन्य मोर्चे देखील विधान भवनावर धडकणार आहेत.
Join Our WhatsApp Community