Manoj Jarange Patil : आमच्या विरोधात बोलू नका, अन्यथा… जरांगेचा इशारा

289
Manoj Jarange Patil : आमच्या विरोधात बोलू नका, अन्यथा... जरांगेचा इशारा

मागील काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. अशातच आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

‘तुम्ही जिभेला आवर घाला, आमच्या विरोधात बोलू नका’ असा इशाराच जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे.

(हेही वाचा – Congress : काँग्रेसचे आधे इधर जाओ आधे उधर जाओ)

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

एकीकडे राज्यात जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सजग राहावं असं सातत्याने सांगितलं जात आहे मात्र दुसरीकडे छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर टीका करत आहे. असं काही त्यांनी करू नये. त्यांना ही माझी (Manoj Jarange Patil) शेवटची विनंती आहे. त्यांनी आपल्या जिभेला आवर घालावी, गोरगरीब लोकांचे चांगले संबंध त्यांनी खराब करू नयेत. तसेच यामधून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न देखील त्यांनी करू नये.

पुढे बोलतांना जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली. देवेंद्र फडणवीस आरक्षण देतो, गुन्हे मागे घेऊ, अटक करणार नाही असे म्हणाले होते. मात्र तरीसुद्धा अटक झाली, गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे फडणवीस फक्त गोड बोलायची कामं करतात. आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे. ते आमच्या आरक्षणासाठी प्रयत्न करतील, पण आमचा फडणवीस यांच्यावर विश्वास नाही असं जरांगे पाटील म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.