PM Narendra Modi : ३७० कलम रद्द करणे हा केवळ निर्णय नसून आशेचा किरण आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रगतीचे लाभ केवळ तुमच्यापर्यंतच पोहोचणार नाहीत, तर कलम ३७० मुळे त्रस्त असलेल्या आपल्या समाजातील सर्वात असुरक्षित आणि उपेक्षित लोकांपर्यंत पोहोचतील

297
PM Narendra Modi : ३७० कलम रद्द करणे हा केवळ निर्णय नसून आशेचा किरण आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Narendra Modi : ३७० कलम रद्द करणे हा केवळ निर्णय नसून आशेचा किरण आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

जम्मू-काश्मीरला(Jammu & Kashmir) विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० (Article 370) रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर याबद्दल जाहीर विचार मांडले आहेत. ते म्हणाले आहेत की, कलम ३७० रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय ऐतिहासिक आहे आणि भारतीय संसदेने ५ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेल्या निर्णयाचे घटनात्मक समर्थन करतो. तसेच त्यांनी पुढे लिहिले आहे की,आजचा निर्णय केवळ कायदेशीर निर्णय नाही तर तो आशेचा किरण आहे. उज्ज्वल भविष्याचे वचन आणि अधिक मजबूत, अधिक अखंड भारत घडवण्याच्या आपल्या सामूहिक संकल्पाचा पुरावा असल्याचेही त्यांनी म्हणले आहे. (PM Narendra Modi )

तसेच पुढे त्यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये असे म्हणले आहे की, मी जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आमची वचनबद्धता अबाधित आहे. प्रगतीचे लाभ केवळ तुमच्यापर्यंतच पोहोचणार नाहीत, तर कलम ३७० मुळे त्रस्त असलेल्या आपल्या समाजातील सर्वात असुरक्षित आणि उपेक्षित लोकांपर्यंत पोहोचतील हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असेही मोदींनी त्यांच्या पोस्ट मध्ये म्हणले आहे. (PM Narendra Modi )

(हेही वाचा : Veer Savarkar: सावरकर कुळातील वीरांगनांची शौर्यगाथा उलगडणारा एकपात्री नाट्यप्रयोग !

 नागरिकांचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत – अमित शहा 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी एक्स वर पोस्ट केले की कलम ३७० हटवल्यानंतर गरीब आणि वंचितांना पुन्हा हक्क मिळाले आहेत.  फुटीरतावाद आणि दगडफेक ही आता भूतकाळातील गोष्ट झाली आहे. संपूर्ण प्रदेश आता मधुर संगीत आणि सांस्कृतिक पर्यटनाशी गुंफलेला आहे. एकतेचे बंध मजबूत झाले आहेत आणि भारताशी असलेली एकात्मता मजबूत झाली आहे. पुन्हा एकदा जम्मू, काश्मीर आणि लडाख हे नेहमीच आपल्या देशाचे होते आणि राहतील.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.