Karnataka Politics : कर्नाटकात पुन्हा राजकीय नाट्य होणार ? कुमारस्वामी यांचा मोठा दावा

Karnataka Politics : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला, त्याच परिस्थितीचा सामना करावा कर्नाटक काॅंग्रेसला करावा लागू शकतो.

251
Karnataka Politics : कर्नाटकात पुन्हा राजकीय नाट्य होणार ? कुमारस्वामी यांचा मोठा दावा
Karnataka Politics : कर्नाटकात पुन्हा राजकीय नाट्य होणार ? कुमारस्वामी यांचा मोठा दावा

कर्नाटकातील (Karnataka) काँग्रेस सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा जनता दल सेक्युलरचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (H.D.Kumaraswamy) यांनी केला आहे. हासन येथे पत्रकारांशी बोलतांना एच. डी. कुमारस्वामी म्हणाले की, कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील अंतर्गत कलह टोकाला पोहोचला आहे.

(हेही वाचा – Garlic Price Hike: लसणाच्या दरात हिवाळ्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण…)

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला, त्याच परिस्थितीचा सामना करावा कर्नाटक काॅंग्रेसला करावा लागू शकतो. कोणत्याही नेत्याचे नाव न घेता कुमारस्वामी यांनी हे संकेत दिले आहेत.

काँग्रेसचे मोठे मंत्री भाजपात प्रवेश करतील, 50-60 आमदार आमच्यात सामील होतील, असेही कुमारस्वामी या वेळी म्हणाले. प्रत्युत्तरात जेडी (एस) च्या नेत्याने मंत्र्याची ओळख उघड न करता, असे धाडसी पाऊल केवळ प्रभावशाली व्यक्तीच उचलू शकतात, असे ठामपणे सांगितले.

हे सरकार फार काळ टिकणार नाही

एच. डी. कुमारस्वामी म्हणाले की, हे सरकार ५ वर्षे टिकणार नाही. मे 2024 नंतर हे सरकार कोसळेल, हे निश्चित आहे. हे सरकार कोणत्याही परिस्थितीत फार काळ टिकणार नाही. जेडी (एस) च्या नेत्याने त्यांच्या दाव्यामागील कारणही स्पष्ट केले.

“काँग्रेसच्या (Congress) एका महत्त्वाच्या मंत्र्याला केंद्रीय एजन्सीकडून चौकशीला सामोरे जावे लागत आहे. कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी ते भाजपात प्रवेश करण्याचा विचार करत आहेत. सध्या ते भाजप (BJP) नेत्यांशी बोलणी करत आहेत आणि पक्ष बदलण्याच्या प्रक्रियेत 50 ते 60 आमदारांना सोबत आणू शकतात”, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar: सावरकर कुळातील वीरांगनांची शौर्यगाथा उलगडणारा एकपात्री नाट्यप्रयोग !)

केवळ प्रभावशाली व्यक्तीच असे करू शकतो

पत्रकारांनी एच. डी. कुमारस्वामी (H.D.Kumaraswamy) यांना काँग्रेस मंत्र्याचे नाव विचारले असता ते म्हणाले की, बंडखोरी करण्याची शक्यता आहे. प्रत्युत्तरात जेडी (एस) च्या नेत्याने मंत्र्याची ओळख उघड न करता ठामपणे सांगितले की, असे धाडसी पाऊल केवळ प्रभावशाली व्यक्तीच उचलू शकतात, लहान नेता नाही.”

यात प्रामाणिकपणा आणि सचोटी नाही 

आजचे राजकीय वातावरण अत्यंत अनपेक्षित आहे. काहीही घडू शकते. त्यात प्रामाणिकपणा आणि सचोटी नाही. आज ते येथे आहेत आणि उद्या ते इतरत्र कुठेतरी उडी मारतील. ही सध्याची राजकीय स्थिती आहे. राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 135 जागा जिंकल्यानंतरही कुमारस्वामी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या निवडणूक सामर्थ्यावर शंका व्यक्त केली.

(हेही वाचा – Vijay Vadettiwar : चंद्रपूर-बल्लारपूर-बामणी-खैरी गोंडपिपरी रस्त्यांचा दर्जा सुधारा)

पत्रकारांशी बोलतांना कुमारस्वामी यांनी सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणाचा हवाला दिला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांच्यावर जातीच्या जनगणनेच्या नावाखाली लोकांमध्ये जातीच्या आधारावर फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे.

हिंदूंसाठी काय तरतुदी केल्या ?

अल्पसंख्याकांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या 10,000 कोटी रुपयांच्या घोषणेबाबत बोलताना कुमारस्वामी म्हणाले, “मी मुस्लिमांसाठी निधी वाटपाच्या विरोधात नाही, तर हिंदूंचे काय ? सर्व हिंदू उच्च जातीतील नसतात. दलित आणि गरीब हिंदूही आहेत. त्यांच्यासाठी काय तरतुदी केल्या जात आहेत.” (Karnataka Politics)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.