Mumbai VIP Road Emergency Work : मुंबईतील व्हीआयपी रस्त्यांवरील आपत्कालिन कामांवर साडेअकरा कोटी रुपयांचा खर्च

मुंबईतील न्यायमूर्ती सिताराम पाटकर मार्ग, मरीन ड्राईव्ह मार्ग तसेच केम्स कॉर्नर येथील रस्त्यावरील आपत्कालिन कामे करण्यात आली असून यासर्व कामांसाठी तब्बल साडे अकरा कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

678
Mumbai VIP Road Emergency Work : मुंबईतील व्हीआयपी रस्त्यांवरील आपत्कालिन कामांवर साडेअकरा कोटी रुपयांचा खर्च
Mumbai VIP Road Emergency Work : मुंबईतील व्हीआयपी रस्त्यांवरील आपत्कालिन कामांवर साडेअकरा कोटी रुपयांचा खर्च

मुंबईतील न्यायमूर्ती सिताराम पाटकर मार्ग, मरीन ड्राईव्ह मार्ग तसेच केम्स कॉर्नर येथील रस्त्यावरील आपत्कालिन कामे करण्यात आली असून यासर्व कामांसाठी तब्बल साडे अकरा कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या तिन्ही रस्त्यांची कामे निविदा न मागवता एकाच कंपनीला देण्यात देऊन ही कामे पूर्ण करून घेण्यात आले आहे. (Mumbai VIP Road Emergency Work)

‘डी’ विभागातील न्यायमूर्ती सिताराम पाटकर मार्गावरील आपत्कालीन कामांसह महापालिकेच्या ‘ए’ व ‘सी’ विभागातील नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावरील हॉटेल ट्रायडेंट ते मरीन ड्राईव पूलापर्यंत मरीन ड्राईव्ह मार्गावर तातडीने स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा अडथळे बसविण्याचे काम आणि ‘डी’ विभागातील केम्स कॉर्नर उड्डाण पूलावर तातडीने डांबरीकरणाचे ओवर बर्डन काढून डीबीएम तथा मास्टिक घालण्याचे काम करण्यात आले. हे तिन्ही मार्ग व्हिआयपी असल्याने या रस्त्यांवर आपत्कालिनसह सुरक्षात्मक कामे करण्यात आली. (Mumbai VIP Road Emergency Work)

मरीन ड्राईव्ह मार्गावर सुरक्षा अडथळे

‘ए’ व ‘सी’ विभागातील नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावरील हॉटेल ट्रायडेंट ते मरीन ड्राईव्ह पूलापर्यंत तातडीने स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा अडथळे बसविण्याचे कामासंदर्भात ०४ नोव्हेंबर २०२० रोजी सह्याद्री अतिथीगृहात तत्कालिन मुख्यमंत्री अति. मुख्य सचिव (गृह), महानगरपालिका आयुक्त आणि पोलिस गुप्तचर विभागातील प्रतिनिधी यांच्या समवेत संयुक्त बैठक घेतली होती. (Mumbai VIP Road Emergency Work)

(हेही वाचा – Do Dhage Sri Ram Ke Liye : रामलल्लाची वस्त्रे पुणेकर विणणार)

तत्कालिन मुख्यमंत्र्यांचे निर्देश

या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावरील मरीन ड्राईव्ह प्रामिनेड वरील पादचाऱ्यांवरील दहशतवादी स्फोटक हल्ला तसेच स्फोटकांनी भरलेल्या वाहनांचा प्रवेश रोखण्यासाठी सुरक्षा अडथळे प्राधान्याने स्थापित करण्याबाबत तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना आदेश दिले होते. त्यानुसार, रस्ते व वाहतूक विभागाने विविध पर्यायामधून उलटा ‘U’ आकारातील सुरक्षा अडथळे सूचविले. तसेच, मुंबई वारसा संवर्धन समितीने (MHCC) या पर्यायास ना-हरकत देऊन हे सुरक्षा अडथळे बसविण्याची शिफारस केली. (Mumbai VIP Road Emergency Work)

न्यायमूर्ती सिताराम पाटकर मार्ग

न्यायमूर्ती सिताराम पाटकर मार्गावर तांत्रिक सल्लागार समिती आय. आय. टी. मुंबई या संस्थेच्या शिफारशीनुसार वाहतूक सुरक्षा फलक बसविणे, भौगोलिक तपास (Geo-Technical investigation) करणे, लिडार सर्वेक्षण, ड्रोन सर्वेक्षण, इत्यादी कामे सक्षम प्राधिकारी यांची मंजुरी घेऊन पूर्ण करण्यात आली. (Mumbai VIP Road Emergency Work)

(हेही वाचा – Sushil Kumar Modi : न्यायाधीशांनी सुध्दा संपत्तीचा तपशील जाहीर करावा – सुशीलकुमार मोदी)

पुलावरील डांबरीकरण काढून केले नव्याने

तर ‘डी’ विभागातील केम्स कॉर्नर उड्डाण पुलावरील तातडीने डांबरीकरणाचे ओवर बर्डन काढून डीवीएम तथा मास्टिक टाकण्यात आले. या उड्डाण पूलावरील डांबरीकरणानंतर, एक्सपान्शन जोइंटवर वाहनांना जर्क बसतो आहे हे लक्षात आल्यावर हा अडथळा दूर करण्यासाठी व रस्त्याची प्रोफाईल योग्य करण्यासाठी संबंधित सल्लागारांच्या सल्ल्यानुसार सुधारित कार्यपध्दतीने सदर एक्सपांशन जोडणीवरील डांबरीकरण काढून पुन्हा डांबरीकरण डीबीएम करण्याकरिताचे वाढीव काम करण्यात आले. (Mumbai VIP Road Emergency Work)

आपत्कालिन कामांच्या नावाखाली एकाच कंपनीला काम

ही तिन्ही कामे स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून करून घेण्यात आली, या तिन्ही कामांची तातडीची निकड, महत्व आणि निविदा प्रक्रियेमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी स्थानिक कंत्राटदार असलेल्या स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकरून घेण्यात आली. कोणत्याही प्रकारच्या निविदा न मागवता एकाच कंपनीकडून तीन ठिकाणच्या रस्त्यांची कामे आपत्कालिन कामांच्या नावाखाली करून घेताना त्यावर तब्बल ११ कोटी ६५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. (Mumbai VIP Road Emergency Work)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.