IQOO 12 : IQOO 12 भारतात होणार लाँच; फिचर्स, किंमत घ्या जाणून

अँड्रॉईड १४ आणि स्नॅपड्रॅगन ९ वर चालणारा भारतातील पहिला अद्ययावत फोन. 

1830
IQOO 12 : IQOO 12 भारतात होणार लाँच; फिचर्स, किंमत घ्या जाणून
IQOO 12 : IQOO 12 भारतात होणार लाँच; फिचर्स, किंमत घ्या जाणून
  • ऋजुता लुकतुके

अँड्रॉईड १४ आणि स्नॅपड्रॅगन ९ वर चालणारा भारतातील पहिला अद्ययावत फोन.

आयक्यू कंपनीचा १२ व्या पिढीचा फोन भारतीय बाजारपेठेत लाँच होत आहे आणि स्नॅपड्रॅगन ८ तसंच अँड्रॉईड १४ चा प्रोसेसर अशा अद्ययावत गोष्टींनी युक्त असा हा भारतातील पहिला फोन आहे. अँड्रॉईड १४ यंत्रणा असलेला हा गुगल पिक्सल नंतरचा पहिला फोन आहे. यानंतर शिओमी, वनप्लस अशा कंपन्यांनीही स्नॅपड्रॅगन प्रोसेसर वापरण्याची तयारी चालवली आहे. पण, हे फोन अजून बाजारात आलेले नाहीत.

एड्रेनो ७५० चा प्रोसेसर फोनमध्ये आहे. त्यामुळे या फोनवर ग्राफिक्सची कामंही करता येतात. या फोनमध्ये १६ जीबीची रॅम आहे आणि १ टेराबाईटपर्यंतचं स्टेरेज यात मिळू शकतं.

(हेही वाचा – Mumbai VIP Road Emergency Work : मुंबईतील व्हीआयपी रस्त्यांवरील आपत्कालिन कामांवर साडेअकरा कोटी रुपयांचा खर्च)

या फोनचा डिस्प्लेही एमोल्ड आणि ३००० नीट्स इतकी प्रखरता असलेला आहे. तर १४४ हर्ट्झ इतका त्याचा रिफ्रेश रेट आहे. फोनचा प्राथमिक कॅमेरा ५०० मेगापिक्सलचा. तर टेनिफोटो लेन्सही ५० मेगापिक्सलची आहे आणि अल्ट्रावाईड लेन्स ६४ मेगापिक्सलची आहे. याशिवाय १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे, ज्यामुळे व्हिडिओ कॉलिंग सारख्या सुविधा वापरता येतील.

फोनची बॅटरी ५००० एमएएच या क्षमतेची आहे आणि १२० वॅट्सच्या चार्जरने दोन तासात हा फोन संपूर्ण चार्ज होऊ शकतो. आयक्यूओओ १२ या फोनची भारतातील किंमत ५२,९९९ रुपयांपासून सुरू होते. तर १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेला फोन ५७,९९९ रुपयांना मिळेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.