Dadar Bhavani Plaza : दादरच्या गॅरेज गल्लीतील ‘त्या’ चारही इमारतीतील गारमेंट्सचे अनधिकृत धंदे होणार बंद

दादर पश्चिम येथील भवानीशंकर रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग तसेच गॅरेज गल्ली आदी परिसरामंमध्ये अनेक इमारतींमध्ये आयटी पार्कच्या नावाखाली एफएसआचा लाभ घेत बांधकाम करण्यात आले.

11740
IT Parkच्या नावाखाली इमारतीचे बांधकाम; प्रत्येक वर्षी सादर करावी लागणार जागेच्या वापरासंदर्भातील कागदपत्रे
IT Parkच्या नावाखाली इमारतीचे बांधकाम; प्रत्येक वर्षी सादर करावी लागणार जागेच्या वापरासंदर्भातील कागदपत्रे

दादर (Dadar) पश्चिम येथील काकासाहेब गाडगीळ मार्गाला जोडणाऱ्या गॅरेज गल्ली परिसरातील भवानी प्लाझा, ओम ऍनेक्स, अटलांटिका प्लाझा आणि पलई कमर्शियल या चार इमारतींमध्ये आयटी पार्कच्या नावावर एफएसआयचा (FSI) लाभ घेत बांधकाम केले. परंतु याठिकाणी प्रत्यक्षात आयटी (IT) संदर्भातील कार्यालयांऐवजी चक्क गारमेंट्स (garments) सुरु आहे. त्यामुळे या चार इमारतींमधील तब्बल ४५० गाळेधारकांना महापालिकेच्यावतीने नोटीस जारी करण्यात आली आहे. मात्र, यातील काहींनी पुरावे सादर केले असून त्यांची छाननी सुर आहे, परंतु यातील दोनशेहून अधिक गाळेधारकांनी अद्यापही कागदपत्रे सादर केली नसून त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये कागदपत्रांचा पुरावा सादर न केल्यास गाळ्यांवर कारवाई होणार असून यासर्व गाळ्यांमधील गारमेंट्सचे (garments) धंदे कायमचे बंद होणार आहे. (Dadar Bhavani Plaza)

गारमेंट्सचा व्यापार तेजीत

दादर पश्चिम येथील भवानीशंकर रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग तसेच गॅरेज गल्ली आदी परिसरामंमध्ये अनेक इमारतींमध्ये आयटी पार्कच्या (IT Park) नावाखाली एफएसआयचा (FSI) लाभ घेत बांधकाम करण्यात आले. या आयटी पार्कचा (IT Park) गैरवापर करणाऱ्या व्यापाऱ्यांना महापालिकेच्यावतीने नोटीस जारी करण्यात आले आहे. तब्बल ११ एकर भुखंडावर आहे आयटी पार्कच्या (IT Park) नावावर इमारती उभ्या असून या आयटी पार्कचे रूपांतर गारमेंट्समध्ये झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भवानी प्लाझा, ओम ऍनेक्स, अटलांटिका प्लाझा आणि पलई कमर्शियल या चार इमारतींमधील सुमारे ४५० व्यापाऱ्यांना महापालिका जी उत्तर विभागाच्यावतीने जागेचा गैरवापर आणि अनधिकृत बांधकाम याप्रकरणी नोटीस जारी करण्यात आल्या आहे. आयटी पार्कचा (IT Park) गैरवापर करतानाच प्रत्यक्षात चेंज ऑफ युजर्स करून न घेता गारमेंट्स (garments) चालवणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांच्या नाड्या चांगल्याच आवळल्या आहेत. (Dadar Bhavani Plaza)

(हेही वाचा – Sushil Kumar Modi : न्यायाधीशांनी सुध्दा संपत्तीचा तपशील जाहीर करावा – सुशीलकुमार मोदी)

रहिवाशी वापराच्या सदनिकांचा वापर कमर्शियल गाळ्यांसाठी

भवानी प्लाझा इमारतीमध्ये (Bhavani Plaza) रहिवाशी वापराचे दोन मजले होते, त्यातील प्रत्येक सदनिकांमध्ये गाळे पाडून त्यांचा वापर कमर्शियल केला जात होता. या इमारतीमध्ये आयटीपार्कचा एफएसआयचा लाभ घेण्यात आला होता. त्यामुळे या इमारतीतील १३० गाळेधारकांना, ओम ऍनेक्समधील ४० गाळेधारक, अटलांटिक प्लाझामधील १४० गाळेधारक आणि पलई प्लाझामधील १४० गाळेधारकांना महापालिकेच्यावतीने नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. (Dadar Bhavani Plaza)

त्या गाळ्यांमधील अनधिकृत पोटमाळे तोडण्यात येणार

त्यामुळे आतापर्यंत पाठवलेल्या ४५० नोटीस पैकी २०० गाळेधारकांनी विहित वेळेत म्हणजे १५ दिवसांच्या कालावधीमध्ये पुरावे सादर केले नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा स्मरणपत्र पाठवून पुरावे सादर करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे जर विहित वेळेत जर २०० गाळेधारकांनी पुरावे सादर न केल्यास त्या गाळ्यांमधील अनधिकृत पोटमाळ्यांसह बांधकाम तोडण्यात येईल,असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मालमत्ता कराच्या देयकाच्या २०० पटीने आकारणार दंड

तर आतापर्यंत ज्या गाळेधारकांनी कागदपत्रे सादर केली आहे, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु आहे. त्यामुळे यासर्वांच्या पडताळणीनंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे जर त्यांचे पुरेसे नसल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यासर्व ठिकाणी गारमेंट्सचे व्यावसाय सुर असल्याने ते सर्व बंद होतील. शिवाय प्रत्येक गाळेधारकाकडून जागेचा गैरवापर आणि अनधिकृत वापर म्हणून आजमितीपर्यंत मालमत्ता कराच्या देयकाच्या रकमेच्या २०० पटीने दंड आकारला जाणार आहे. ज्याद्वारे कारवाईसह दंडाची रक्कम आकारल्याने महापालिकेच्या तिजोरीत मोठ्याप्रमाणात महसूल जमा होईल, असे बोलले जात आहे. (Dadar Bhavani Plaza)

(हेही वाचा – WhatsApp New Features : आता व्हॉट्सअॅप तारखेने शोधता येणार एखादा संदेश)

आयटी पार्कचा गैरवापर केलेल्या इमारती
  • भवानी प्लाझा इमारत – १३० मध्ये नोटीस
  • ओम अॅनेक्स इमारत – ४० नोटीस
  • अटलांटिका प्लाझा इमारत – १४० नोटीस
  • पलई कमर्शियल इमारत – १४० नोटीस (Dadar Bhavani Plaza)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.