Indigo: इंडिगो प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांना फटका, उड्डाण घेण्यापूर्वीच विमानाचे पार्किंग ब्रेक जाम

 अॅड उज्ज्वल निकम यांच्यासह १२५ प्रवासी बचावले.

208
Indigo: इंडिगो प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांना फटका, उड्डाण घेण्यापूर्वीच विमानाचे पार्किंग ब्रेक जाम
Indigo: इंडिगो प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांना फटका, उड्डाण घेण्यापूर्वीच विमानाचे पार्किंग ब्रेक जाम

मुंबईहून संभाजीनगरला जाणारे इंडिगो (indigo) कंपनीचे विमान सोमवारी, ११ डिसेंबरला सायंकाळी ४.५५ वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण घेण्यापूर्वी पार्किंग ब्रेक जाम झाल्यामुळे अडकले. या विमानात १२५ पेक्षा जास्त प्रवासी होते तसेच अॅड. उज्ज्वल निकमही होते.

मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला जाणारे हे विमान मुळात उशिरा मुंबई विमानतळावर आले. त्यावेळी विमानाच्या टायरमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे विमानाचे टायर बदलण्यात आले. या दुरुस्तीमध्ये बराच वेळ गेला. त्यानंतर प्रवाशांना विमानात बसवण्यात आले. सीटबेल्ट लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व प्रवाशांनी सीटबेल्ट लावला आणि नंतर विमान उड्डाणासाठी जंक्शनकडे निघाले. त्यावेळी जंक्शनकडे येताच विमानाचे पार्किंग ब्रेक जाम झाले. ही गोष्ट विमानाच्या वैमानिकाच्या लक्षात आली. त्यानंतर विमान जागचे हलूही शकले नाही. अशा वेळी उड्डाण घेणेच शक्य नसल्यामुळे त्याला टो करून परत पार्किंगमध्ये पूर्वीच्या ठिकाणी आणण्यात आले.

(हेही पहा – Train Beggar : ट्रेनमध्ये गाणी गाऊन भीक मागणारा निघाला सराईत मोबाईल चोर )

ढिसाळ नियोजनाचा फटका..
त्यानंतर विमान पार्किंगमध्ये आणल्यानंतर सर्व प्रवाशांना पुन्हा एका सभागृहात परत आणण्यात आले. त्यानंतर रात्री ९ ते ९.३० वाजेपर्यंत रात्री या कुणीही याची दखल घेतली नाही. १२५हून जास्त प्रवाशांची व्यवस्था एखाद्या हॉटेलमध्ये करणे शक्य नसल्याने नवीन विमानाने प्रवाशांना छत्रपती संभाजीनगरला सोडण्याचा निर्णय घेतला. इंडिगो प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा प्रवाशांना फटका बसला.

वैमानिकाची प्रतिक्रिया…
या विमानाने उड्डाण घेतले असते, तर कदाचित प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती, पण अखेर टो करून हे विमान पार्किंगमध्ये परत आणण्यात आले, असे या विमानाच्या वैमानिकाने सांगितले.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.