Robbery : माजी कर्मचाऱ्यानेच मारला अंगाडीयाच्या ४ कोटींवर डल्ला 

242
Robbery : माजी कर्मचाऱ्यानेच मारला अंगाडीयाच्या ४ कोटींवर डल्ला 
Robbery : माजी कर्मचाऱ्यानेच मारला अंगाडीयाच्या ४ कोटींवर डल्ला 
काळबादेवी येथील अंगाडीया व्यवसायिकाच्या  कार्यालयात रविवारी टाकण्यात आलेल्या दरोड्या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी माजी कर्मचाऱ्यासह ६ जणांना गुजरात राज्यात पळून जात असताना पालघर (Robbery) येथे वाटेतच अटक केली आहे. या टोळीने दरोड्यात लुटलेली ४ कोटी ३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. लो.टी. मार्ग पोलिसांनी ३० तासांत दरोड्याच्या गुन्ह्याची उकल केली आहे.
हर्षद चेतनजी ठाकूर (२६),राजूबा वाघेला(२१), अशोकभा वाघेला(२६)चरणभा वाघेला (२६), मेहुलसिंग ढाबी (२४) आणि चिरागजी ठाकूर(२६) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. हर्षद ठाकूर हा अंगाडीयाच्या कार्यालयातील माजी कर्मचारी होता. काळबादेवी येथील आदित्य हाईट्स, या ठिकाणी केडीएम एंटरप्राइज नावाचे अंगाडीयाचे कार्यालय आहे. या कार्यालयात रविवारी सकाळी चार शस्त्रधारी व्यक्तींनी प्रवेश करून कार्यालयात असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून बांधून त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावून कार्यालयातील ४ कोटी ३ लाख रुपयांच्या रोकडसह पोबारा केला होता.

(हेही वाचा-Train Beggar : ट्रेनमध्ये गाणी गाऊन भीक मागणारा निघाला सराईत मोबाईल चोर 

या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. लो.टी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास कैर आणि गुन्हा प्रकटीकरण पथकाने तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले असता त्यात पोलिसांना एक संशयित इसम इमारतीच्या खाली आढळून आला. पोलिसांनी त्या व्यक्तीची ओळख पटवली असता तो हर्षद ठाकूर हा अंगाडीयाचा माजी कर्मचारी असल्याचे समोर आले.
पोलिसांनी तात्काळ या टोळीचा माग काढला ही टोळी टॅक्शीने बोरिवली नॅशनल पार्क येथे उतरले,तेथून या टोळीने खाजगी कार करून गुजरातच्या दिशेने गेले असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी खाजगी कारचा नंबर काढून कार चा पाठलाग सुरू केला, दरम्यान लोटी. मार्ग पोलिसांचे एक पथक तपासकामी (Robbery) गुजरात येथे गेले होते, ते  गुजरात येथून परतत असताना मुंबईतील पथकाने ही माहिती त्या पथकाला दिली. गुजरात येथून येणाऱ्या पथकाने पालघर येथे दरोडेखोराची कार ओळखून तीला थांबवून आरोपीना ताब्यात घेण्यात आले.
आरोपीना लुटलेल्या रोकडसह ताब्यात घेऊन सोमवारी  दुपारी हे पथक मुंबईत दाखल झाले व सर्व आरोपीना अटक करून त्याच्याजवळून लुटलेली रोकड जप्त करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.