गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. डिसेंबर महिन्यात थंडीला सुरुवात झाली असली, तरी यावर्षी देशात थंडीचा पॅटर्न (Weather Update) बदलला आहे. दिवसा थंडी वाजत असून पहाटे गारवा कमी राहणार आहे. पुढील काही दिवस देशात असंच वातावरण राहणार असण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
सध्या उत्तर भारतात थंडीची लाट असली, तरी काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच राज्याच्या काही भागात गारवा, काही ठिकाणी थंडी, ढगाळ वातावरणाचा प्रभाव, अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. एल-निनोच्या प्रभावामुळे वातावरणात बदल होत राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
(हेही वाचा – Robbery : माजी कर्मचाऱ्यानेच मारला अंगाडीयाच्या ४ कोटींवर डल्ला )
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गेल्या दोन दिवसांपासून बहुतांश राज्यांच्या कमाल आणि किमान तापमानात सुमारे २ ते ३ अंश सेल्सियसची घसरण नोंदवण्यात आली आहे. १५ डिसेंबरपर्यंत उत्तर भारताच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज …
मिचॉंग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे बदललं होतं, पण आता पर्वतीय भागात बर्फवृष्टी झाल्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर वाढत आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.
- येत्या आठवड्यात राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पुढील २ दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता असून हलक्या थंडीला सुरुवात होणार आहे.
- मुंबईतही गुलाबी थंडी पडणार आहे, मात्र रात्री थंडी जाणवली तरीही दिवसा उकाडा जाणवणार आहे.