बेस्टने (BEST) अंधेरी स्थानकापासून सीप्झ मार्गावरील शेवटची सामान्य डबल-डेकर बस सेवा मागे घेतल्यानंतर तीन महिन्यांनी आता या मार्गावर विद्युत वातानुकूलित (एसी) डबल-डेकर बस सेवा सुरू केली आहे. अंधेरी आणि कुर्लादरम्यान ३३२ क्रमांकांच्या इलेक्ट्रिक एसी डबल डेकर असलेला आणखी एक मार्ग आहे. या अंधेरी ते सीप्झ आणि अंधेरी ते कुर्ला डेपोपर्यंत धावणार आहेत, कारण कुर्ला बस स्थानकाच्या उंचीमुळे नवीन बस कुर्ला बस स्थानकात प्रवेश करू शकत नसल्यामुळे बससेवा एल. बी. एस. रोडवरील कुर्ला बस डेपोपुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे.
(हेही वाचा – Onion Issue : कांदा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय )
अंधेरी स्थानकाच्या बाहेरून अनेक कार्यालयीन प्रवासी बसमध्ये चढत असल्याने या मार्गावर इतर मार्गाप्रमाणेच प्रवाशांच्या गर्दीचे प्रमाण जास्त असते. सप्टेंबरच्या मध्यात या मार्गावर डबल-डेकर बस सुरू करण्यात आली होती. याविषयी बेस्टच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, सोमवारपासून ३३२ आणि ४१५ या मार्गावर १० नवीन इलेक्ट्रिक एसी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.
नव्या बसेसना कुर्ला स्थानकात येण्यास अडचण…
नवीन डबल डेकरची उंची ४.७५ मीटर आहे, तर सामान्य डबल डेकरची उंची ४.३८ मीटर आहे. त्यामुळे नव्या बसेसना कुर्ला स्थानकावर पोहोचण्यासाठी सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडवरून येण्यास अडचणी येतात, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
हेही पहा –