PM Narendra Modi करणार कृत्रिम बुद्धिमत्ता जागतिक भागीदारी वार्षिक शिखर परिषदेचे उद्घाटन

265
PM Narendra Modi करणार कृत्रिम बुद्धिमत्ता जागतिक भागीदारी वार्षिक शिखर परिषदेचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज म्हणजेच मंगळवार १२ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता नवी दिल्लीत भारत मंडपम इथे कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी शिखर परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

जीपीएआय हा २९ सदस्य देशांचा बहुपक्षीय उपक्रम आहे, ज्याचा उद्देश, कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयातील पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्षात वापर यातील तफावत भरून काढणे, आणि एआयशी संबंधित प्राधान्ये तसेच, संशोधनाला पाठिंबा देणे, असा आहे. २०२४ साली भारताकडे जीपीएआयचे अध्यक्षपद आहे. २०२० साली स्थापन झालेल्या जीपीएआयच्या संस्थापक सदस्यांपैकी एक, जीपीएआयचे समर्थक अध्यक्ष आणि २०२४ मध्ये जीपीएआयचे प्रमुख अध्यक्ष म्हणून भारत १२ ते १४ डिसेंबर २०२३ या कालावधीत वार्षिक जीपीएआय शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Onion Issue : कांदा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय)

या शिखर परिषदेदरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जागतिक आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा प्रशासन आणि एम. एल. कार्यशाळा यासारख्या विविध विषयांवर अनेक सत्रे आयोजित केली जातील शिखर परिषदेतील इतर आकर्षणांमध्ये संशोधन परिसंवाद, एआय गेमचेंजर्स पुरस्कार आणि इंडिया एआय प्रदर्शन यांचा समावेश आहे. (PM Narendra Modi)

या शिखर परिषदेत देशभरातील ५० हून अधिक जीपीएआय तज्ञ आणि १५० हून अधिक वक्त्यांचा सहभाग असेल. याव्यतिरिक्त, इंटेल, रिलायन्स जिओ, गुगल, मेटा, एडब्ल्यूएस, योट्टा, नेटवेब, पेटीएम, मायक्रोसॉफ्ट, मास्टरकार्ड, एनआयसी, एसटीपीआय, इमर्स, जिओ हॅप्टिक, भाषिणी यासह विविध कार्यक्रमांमध्ये जगभरातील आघाडीचे एआय गेमचेंजर्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ताच्या मदतीने आमूलाग्र बदल घडवणारे तंत्रज्ञ सहभागी होतील. याव्यतिरिक्त, युवा एआय उपक्रम आणि स्टार्ट-अप्स अंतर्गत विजेते असलेले विद्यार्थी त्यांचे एआय मॉडेल आणि त्यांच्या मदतीने समस्यांवरील उपाय या प्रदर्शनात मांडले जातील. (PM Narendra Modi)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.