मुंबईत उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलांचा खर्च वसूल झाला तरीही या उड्डाणपुलपोटी मुंबईतील प्रवेशद्वारावर आकारला जाणारा टोल ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत सुरूच राहणार असल्याची माहिती (Dada Bhuse) सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सोमवार म्हणजेच ११ डिसेंबर रोजी विधानसभेतील लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी टोल नाके सुरू असून, मोठ्या प्रमाणात वसूली करूनही रस्त्यांची दुरवस्था झाल्याची कबुली देखील भुसे यांनी दिली आहे.
(हेही वाचा – China Warns Pakistan: कर्ज लवकर फेडा नाहीतर..चीनने पाकिस्तानला धमकावले; नेमकी काय आहे ‘रणनिती’? वाचा सविस्तर…)
यासंदर्भात पुढे माहिती देतांना दादा भुसे (Dada Bhuse) म्हणाले की, “मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या ५५ उड्डाणपूलांच्या प्रकल्पावर एकूण १२५९ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या प्रकल्पावरील खर्च, त्यावरील व्याज, परतावा तसेच देखभाल व दुरुस्तीचा खर्च यांच्या परतफेडीसाठी महाराष्ट्र सरकारने २५ वर्षांच्या कालावधीसाठी ऑक्टोबर २००२ ते सप्टेंबर २०२७ पर्यंत टोलवसुलीचे हक्क महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला दिले आहेत.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community