राज्यातील ढासळलेली व व्हेंटिलेटरवर असलेल्या आरोग्यव्यवस्थेविरोधात (Winter Session 2023) मंगळवारी मविआच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिकात्मक आंदोलन केले. जनतेचं आरोग्य खराब करणाऱ्या सरकारचे स्टेटोस्कोप घेऊन तपासणी करणार अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोग्य व्यवस्थेवरून सरकारला चिमटा काढला.
गळ्यात स्टेटोस्कोप व तोंडाला मास्क घालून मंत्री खात तुपाशी, रुग्ण मरतायत उपाशी रुग्णांना नाही औषध गोळी, आरोग्यव्यवस्थेची झाली होळी आधी घोषणा देत विरोधी पक्षनेत्यांनी विधीमंडळ परिसर दणाणून सोडला.
(हेही वाचा-Dada Bhuse : मुंबईत प्रवेश करण्यासाठी २०२७ पर्यंत भरावा लागणार टोल)
राज्यात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. राज्यात नागपूर, नांदेड, संभाजी नगर, कळवा या ठिकाणी औषधाविना मोठया प्रमाणात मृत्यू झाले. तरी सरकारने औषधं खरेदी केले नाही. राज्याची आरोग्य व्यवस्था गॅस वर आहे. सरकार जनतेचं आरोग्य राखू शकत नाही, जीव वाचवू शकत नाही की रुग्णांना ५ रुपयांची गोळी देऊ शकत नाही. याला सर्वस्वी सरकार, आरोग्यविभाग जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
Join Our WhatsApp Community