मुंबई आणि महाराष्ट्रात डेंग्युने (Dengue disease) डोकं वर काढलं आहे. राज्यात दर तासाला सरासरी २ रुग्णांना डेंग्युची लागण झाली आहे. महाराष्ट्र डेंग्युच्या आजाराच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावर्षी १ जानेवारी ते ३० नोव्हेंबरपर्यंत देशभरात २ लाख ३४ हजार ४२७ डेंग्युचे रुग्ण आढळले. यापैकी महाराष्ट्रात डेंग्युच्या रुग्णांची संख्या १७ हजार ५३१ आहे. प्रथम क्रमांकावर असलेल्या उत्तर प्रदेशात सर्वाधिक ३३ हजार ७५ डेंग्युचे रुग्ण आढळले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर बिहारचा आहे. बिहारमध्ये १९ हजार ६७२ रुग्ण आढळले आहेत.
(हेही वाचा – Winter Session 2023 : राज्यातील ढासळलेल्या आरोग्यव्यवस्थेविरोधात मविआचे प्रतिकात्मक आंदोलन)
Join Our WhatsApp Community