- ऋजुता लुकतुके
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यासाठी भारतीय संघ ‘गेबेखा’ला पोहोचला तेव्हा तिथल्या स्थानिक भारतीयांनी संघाचं जोरदार स्वागत केलं.
सध्या दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघ जिथे जिथे जाईल, पाऊस त्यांचं स्वागत करतोय. पहिला दरबनमधील टी-२० सामना पावसात वाहून गेल्यावर दोन्ही संघ दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी सोमवारी उशिरा ‘गेबखा’ला पोहोचले. तर पाऊसही संघाच्या आधीच इथं पोहोचला होता. त्यामुळे मंगळवारी दुसरा टी-२० सामना वेळत होण्याची शक्यता कमीच आहे.
पण, त्यामुळे भारतीय खेळाडू आणि इथले स्थानिक भारतीय यांचा उत्साह जराही कमी झालेला नाही. सोमवारी संघ गेबेखाला पोहोचला तेव्हा लोकांनी भारतीय खेळाडूंचं जोरदार स्वागत केलं. बीसीसीआयने त्याचा व्हिडिओ अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
Durban 🛫 Gqeberha 🛬#TeamIndia have arrived ahead of the 2nd T20I.#SAvIND pic.twitter.com/wjsP2vAq6U
— BCCI (@BCCI) December 11, 2023
असं झालं भारतीय खेळाडूंचं स्वागत
भारतीय खेळाडू विमानतळाबाहेर आले तेव्हा दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती आणि अक्षरश: टाळ्यांच्या गजरात खेळाडूंचं इथं स्वागत झालं. खेळाडूही त्यामुळे खूश होते आणि त्यांनी रँप वॉक केल्यासारखा शहरात प्रवेश केला आणि लोकांचं कौतुक स्वीकारलं. विशेष म्हणजे संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचं इथल्या चाहत्यांना विशेष कौतुक आहे. यापूर्वी तीनदा द्रविड यांनी आफ्रिकेचा दौरा केला आहे आणि यात त्यांची कामगिरी अव्वल आहे.
राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे भारताचे दक्षिण आफ्रिकेत यशस्वी ठरलेले फलंदाज आहेत. टी-२० मालिकेत मात्र अजून तरी युवा खेळाडूंना आपलं कसब दाखवण्याचीच संधी मिळालेली नाही. गेबेखामध्येही ढगाळ वातावरणच दिसत आहे.
(हेही वाचा – Winter Session 2023 : राज्यातील ढासळलेल्या आरोग्यव्यवस्थेविरोधात मविआचे प्रतिकात्मक आंदोलन)
‘हा’ आहे हवामानाचा अंदाज
आणि हवामानाचा अंदाज बघितला तर दुपारी ९९ टक्के ढग दाटलेले असतील अशी शक्यता आहे आणि पावसाच्या २-३ मजबूत सरी कोसळतील असं हवामान खात्याने म्हटलं आहे. दुपारनंतर आकाश थोडंफार उघडेल. पण, वातावरण ढगाळच राहील. आणि संध्याकाळीही ८९ टक्के ढगांचं आच्छानद असेल असा अंदाज आहे.
स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता हा सामना होणार आहे आणि भारतीय वेळेनुसार साडे आठ वाजता.
गेबेखा म्हणजे पूर्वाश्रमीचं पोर्ट एलिझाबेथ. इथल्या स्थानिक झुलु लोकांनी ब्रिटिशांनी दिलेलं हे नाव बदलून पूर्वीचं गेबेखा करावं अशी मागणी केली होती. त्यानंतर २०२१ साली हे नाव बदलून मूळ गेबेखा कायम करण्यात आलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community