Mutual Fund SIP : २५० रुपयांपासून एसआयपी सुरू करण्याची सेबीची योजना 

सध्या एसआयपीची किमान मर्यादा ५०० रुपये आहे. म्हणजे एका योजनेत किमान पाचशे रुपये गुंतवावे लागतात. 

1285
Mutual Fund SIP : २५० रुपयांपासून एसआयपी सुरू करण्याची सेबीची योजना 
Mutual Fund SIP : २५० रुपयांपासून एसआयपी सुरू करण्याची सेबीची योजना 
  • ऋजुता लुकतुके

सध्या एसआयपीची (SIP) किमान मर्यादा ५०० रुपये आहे. म्हणजे एका योजनेत किमान पाचशे रुपये गुंतवावे लागतात. (Mutual Fund SIP)

म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढावी, गुंतवणुकीची व्याप्ती वाढावी यासाठी एसआयपीची (SIP) सध्याची किमान मर्यादा ५०० रुपयांवरून २५० रुपयांपर्यंत कमी करण्याचा सेबीचा (SEBI) विचार आहे. असं झालं तर म्युच्युअल फंड योजना (Mutual Fund Schemes) समाजातील जास्त घटकांपर्यंत पोहोचतील, भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक वाढेल आणि देशाच्या विकासातही हातभार लागेल, असं सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात, सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बूच यांना वाटतं. (Mutual Fund SIP)

सेबी (SEBI) ही भारतीय शेअर बाजारांची नियामत संस्था आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचं हित जोपासणं हे संस्थेचं मुख्य काम आहे. इंडिया टूडे समुहाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना बूच यांनी याविषयी सुरू असलेल्या कामाची कल्पना दिली. (Mutual Fund SIP)

‘सेबी (SEBI) विविध म्युच्युअल फंड कंपन्यांशी या संदर्भात बोलत आहे. तसं झालं तर एसआयपीची (SIP) किमान मर्यादा २५० रुपयांवर आणता येईल,’ असं त्या म्हणाल्या. अडीचशे रुपयांपासून सिप सुरू करण्यासाठी म्युच्युअल फंडांवर (Mutual Fund) अतिरिक्त बोजा पडेल. त्यांचा फंड चालवण्याचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने आता विचार सुरू आहे. पण, गुंतवणुकदार आणि भारतीय शेअर बाजारांसाठी ही चांगली बातमी असेल असं त्यांना वाटतं. (Mutual Fund SIP)

‘एकदा २५० रुपयांची सिप शक्य झाली तर भारतीय शेअर बाजारांचं (Indian stock market) तेच होईल जे हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने १ रुपयांच्या शँपू सॅशेनं करून दाखवलं. सगळे शँपू वापरायला लागले. भारतातही गुंतवणुकदारांचा कल म्युच्युअल फंडांकडे (Mutual Fund) वाढेल आणि त्याचा फायदा भारतीय शेअर बाजार (Indian stock market) आणखी मजबूत व्हायला होईल,’ असं आपला मुद्दा स्पष्ट करताना त्या म्हणाल्या. (Mutual Fund SIP)

एसआयपी (SIP) म्हणजे काय? 

एसआयपी (SIP) हा म्युच्युअल फंड योजनेत नियमितपणे पैसे गुंतवण्याचा एक मार्ग आहे. म्हणजे एखाद्या म्युच्युअल फंड योजनेत (Mutual Fund Schemes) दर महिन्याला ठरावीक रक्कम गुंतवायची. ती योजना आणि तुमची बँक यांना पूर्वकल्पना दिली की पूर्वनियोजित तारखेला तेवढे पैसे तुमच्या बँक खात्यातून वळते होतात आणि ते पूर्वनिर्धारित म्युच्युअल फंड योजनेत (Mutual Fund Schemes) जमा होतात. (Mutual Fund SIP)

(हेही वाचा – Crime : ग्रँटरोडच्या आर्यन बार मध्ये गाण्यावरून दोन गटात राडा )

सध्या एका म्युच्युअल फंड योजनेत (Mutual Fund Schemes) एसआयपी (SIP) सुरू करायची झाल्यात तिची किमान मर्यादा ५०० रुपये इतकी आहे. म्हणजे किमान ५०० रुपये महिन्याला तुम्हाला गुंतवावे लागतात. पण, आता ही मर्यादा २५० रुपयांपर्यंत खाली आणण्याचा सेबीचा विचार आहे. म्युच्युअल फंड कंपनीला एसआयपी योजना सुरू करून घेताना काही खर्च येतो. (Mutual Fund SIP)

गुंतवणूकदाराबरोबर करायचे करार-मदार आणि इतर नोंदणी यासाठी येणारा खर्च पाहूनच किमान एसआयपी (SIP) रक्कम ५०० रुपये ठरवलेली होती. आता म्युच्युअल फंड कंपन्यांचा एसआयपी (SIP) सुरू करताना येणारा खर्च कसा कमी करता येईल याचा विचार सध्या सुरू आहे. ते झाल्यावर सिपची मर्यादा कमी करता येईल. कधीपर्यंत हा बदल पाहायला मिळेल हे मात्र सेबीने (SEBI) नेमकेपणाने सांगितलेलं नाही. (Mutual Fund SIP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.