Mary Kom to Turn Professional? मेरी कोमचा विचार व्यावसायिक मुष्टियुद्धाकडे वळण्याचा

हौशी मुष्टियुद्धात वयाच्या अडसरामुळे आता मेरी कोम खेळू शकत नाही

239
Mary Kom : ऑलिम्पिक संघटना आपलं ऐकत नसल्याचा मेरी कोमचा आरोप
  • ऋजुता लुकतुके

हौशी मुष्टियुद्धात वयाच्या अडसरामुळे आता मेरी कोम खेळू शकत नाही

२०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेती मुष्टियोद्धा मेरी कोम येणाऱ्या दिवसांत व्यावसायिक मुष्टीयुद्धाकडे वळू शकते. मेरी कोमने अजूनही हौशी मुष्टियुद्धातून निवृत्ती स्वीकारलेली नाही. पण, अलीकडे बदललेल्या नियमानुसार, हौशी प्रकारात ४० वर्षं वयापर्यंतच तुम्ही खेळू शकता. आणि मेरी कोम आता ४१ वर्षांची आहे. त्यामुळे आगामी काळात ती विश्वविजेतेपद, ऑलिम्पिक यासारख्या स्पर्धांमध्ये खेळू शकणार नाही. आता तिच्याकडे पर्याय आहे तो व्यावसायिक मुष्टियोद्धाचा. (Mary Kom to Turn Professional)

पण, त्यावर अजूनही विचार केला नसल्याचं तिने म्हटलं आहे. सध्या ती एसीएल या आजारामुळे रिंगणापासून दूर आहे. २०२२ च्या राष्ट्रकूल स्पर्धेच्या ट्रायल दरम्यान तिला ही दुखापत झाली. मेरीच्या नावावर सहा विश्वविजेतेपदं जमा आहेत. (Mary Kom to Turn Professional)

(हेही वाचा Crime: खोपोलीत केमिकल फॅक्टरीवर छापा, २१८ कोटींचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त)

‘मी अगदी मनापासून सांगते की, मला अजूनही हौशी क्रीडास्पर्धांमध्ये भाग घेण्याची आणि पदकं जिंकण्याची भूक आहे. पण, मी वयाच्या मर्यादेमुळे खेळू शकत नाही. आणि पुढे काय करायचं यावर माझा विचार अजून सुरू आहे. व्यावसायिक मुष्टियुद्ध हा एक पर्याय माझ्यासमोर आहे,’ असं तिने पीटीआयशी बोलताना सांगितलं. (Mary Kom to Turn Professional)

अजून ३ ते ४ वर्षं स्पर्धात्मक मुष्टियुद्ध खेळण्याचा तिचा विचार आहे. आणि या खेळाशी संबंधित काहीतरी करणार असली तरी नक्की काय करायचं हे तिने अजून ठरवलेलं नाही. (Mary Kom to Turn Professional)

(हेही वाचा – Pink E-Rickshaw: महाराष्ट्रात धावणार ‘गुलाबी रिक्षा’, काय आहे योजना ? वाचा सविस्तर…)

२०२२ पासून दुखापतीमुळे मेरी कोम रिंगपासून दूर आहे. आणि त्यानंतर विश्वविजेतेपद, राष्ट्रकूल स्पर्धा तसंच आशियाई क्रीडास्पर्धा ती खेळलेली नाही. आता नवीन हंगामात वयाच्या अटीमुळे ती खेळू शकणार नाहीए. (Mary Kom to Turn Professional)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.