Bhajan Lal Sharma : भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

332

राजस्थानमधील मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. जयपूरमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा (Bhajan Lal Sharma) यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. राजस्थानमधील निवडणूक निकालानंतर नऊ दिवसांनी मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. भजनलाल शर्मा हे सांगानेरचे आमदार असून पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर ते आता राजस्थानचे मुख्यमंत्री होणार आहेत.

शर्मा संघ आणि भाजप नेतृत्वाच्या जवळचे

भजनलाल शर्मा  (Bhajan Lal Sharma) हे भरतपूरचे रहिवासी आहेत. बाहेरचे असल्याचा आरोप असतानाही ते सांगानेरमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. शर्मा यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८०८१ मतांनी पराभव केला. भजनलाल शर्मा हे संघ आणि संघटना या दोघांच्याही जवळचे मानले जातात. भजनलाल शर्मा हे ब्राह्मण समाजातील आहेत. विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून त्यांना उमेदवारी देण्यात आली. भाजप आणि संघटनेत दीर्घकाळ काम केले. राजस्थानमधील लोकसंख्येपैकी सुमारे 7 टक्के लोक ब्राह्मण आहेत. राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेसोबतच दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली आहे. दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांना उपमुख्यमंत्री, तर वासुदेव देवनानी विधानसभेचे अध्यक्ष असतील.

(हेही वाचा China Warns Pakistan: कर्ज लवकर फेडा नाहीतर..चीनने पाकिस्तानला धमकावले; नेमकी काय आहे ‘रणनिती’? वाचा सविस्तर…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.