Devendra Fadnavis : राज्यात ‘हमास’ आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

237

‘हमास’ ही आतंकवादी संघटना आहे. ‘हमास’ संघटनेचा कुणी उदो-उदो करत असेल, तर त्याला भारताचे समर्थन नाही. राज्यात कुठेही ‘हमास’ आतंकवाद्यांच्या समर्थनाचे प्रकार होत असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी १२ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत दिले.

पोलीस निरीक्षक उद्धव ढमालेंवर तात्काळ कारवाई करा

भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले की, ८ नोव्हेंबर २०२३ या दिवशी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात मुसलमान समाजाची फेरी निघाली. ही फेरी बाजारपेठेत आल्यानंतर काही समाजकंटकांनी ‘हमास’ या आतंकवादी संघटनांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. ‘हमास’चे झेंडेही दाखवले. पोलीस बंदोबस्त तैनात असतांनाही अशा प्रकारे देशाच्या भूमिकेच्याविरुद्ध कृृत्य करण्यात आले. त्यामुळे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

त्यावर बोलताना मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, ‘इस्त्रायलवर ‘हमास’ने केलेले आक्रमण चुकीचे आहे’, अशी भूमिका भारत सरकारने स्पष्ट केलेली आहे. शिवाय ‘पॅलेस्टाईन’च्या बाजूने उभे रहाण्याच्या भूमिकेवरही भारत देश कायम आहे. आपण ‘पॅलेस्टाईन’च्या बाजूने असलो, तरी ‘हमास’च्या बाजूने नाही. ‘हमास’ ही आतंकवादी संघटना म्हणून घोषित झालेली आहे.

(हेही वाचा Amit Shah : …तर पाकव्याप्त काश्मीर निर्माण झाला नसता; अमित शाह यांनी सांगितल्या जवाहरलाल नेहरूंच्या चुका)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.