Disha Salian : दिशा सालीयन मृत्यूचा तपास अप्पर पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली होणार

229
दिशा सालीयन (Disha Salian) मृत्युचा तपास पुन्हा एकदा करण्यात येणार आहे, यापूर्वी पोलीस अधिकारी यांनी केलेल्या तपासात काही त्रुटी राहून गेली असल्यास त्याचा सविस्तर तपास करण्यासाठी विशेष पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली आहे. उत्तर प्रादेशिक पोलीस विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन आणि परिमंडळ ११चे पोलीस उपायुक्त अजय बन्सल यांच्या नेतृत्वाखाली मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव हे प्रकरणाचा तपास करणार आहे.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालीयन (Disha Salian) मृत्युचा तपास पुन्हा करण्याचे लेखी आदेश मुंबई पोलिसांनी दिले आहे. ३ वर्षांपूर्वी झालेल्या दिशा सालीयन मृत्युच्या तपासात पूर्वीच्या पोलीस अधिकारी यांच्याकडून काही त्रुटी राहून गेल्या असल्यास त्याचा पुन्हा एकदा तपास करण्यात यावा व त्याचा अहवाल गृह विभागाकडे सादर करण्यात यावा, असा आदेश मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे.
दिशा सालीयनच्या मृत्यूला ३ वर्षे उलटून गेले असून पूर्वीच्या तपास अधिकारी यांनी या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता. या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशा सालीयन हिने आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले होते. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून सातत्याने आरोप करण्यात येत होते. नितेश राणे यांनी दिशा सालीयन मृत्यु प्रकरणात एसआयटी स्थापन करून पुन्हा तपास सुरू करण्याची मागणी केली होती.अखेर दिशा सालीयन मृत्युचा तपास करण्यासाठी गृहमंत्री यांनी परवानगी दिली असून मुंबई पोलिसांना याप्रकरणी लेखी आदेश दिला आहे. मुंबई पोलिसांकडून दिशा सालीयन मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा एकदा उघडण्यात येणार असून या तपासासाठी अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन,पोलीस उपायुक्त अजय बन्सल यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव करणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.