Western And Eastern Express Highway : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या देखरेखीवर साडेतीन कोटींचा खर्च

मुंबई महापालिकेत सुमारे २०५० कि. मी. लांबीचे रस्ते असून यासर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण टप्प्याटप्याने करण्यात येत आहे.

837
Express Highway : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग ठरतात महापालिकेसाठी पांढरे हत्ती
Express Highway : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग ठरतात महापालिकेसाठी पांढरे हत्ती

मुंबई महापालिकेच्या ताब्यात आलेल्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची सुधारणा करण्यासाठी दोन स्वतंत्र कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या महामार्गांची सुधारणा करण्यात आली आहे. परंतु या दोन्ही रस्त्यांच्या सुधारणांसाठी सुमारे १८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून या मार्गावरील रस्त्यांच्या दर्जा तपासण्यासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च केला आहे. (Western And Eastern Express Highway)

यापूर्वी महापालिका अभियंत्यांच्या देखरेखीखाली रस्त्यांची कामे

मुंबई महापालिकेत सुमारे २०५० कि. मी. लांबीचे रस्ते असून यासर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण टप्प्याटप्याने करण्यात येत आहे. याशिवाय एमएमआरडीएच्या (MMRDA) ताब्यात असलेले माहिम ते दहिसर चेकनाका हा पश्चिम द्रुतगती महामार्ग, तसेच शीव ते मुलुंड चेक नाका हे पूर्व द्रुतगती महामार्ग हे महापालिकेच्या ताब्यात सोपवण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या या रस्त्यांच्या सुधारणांच्या कामांवर देखरेख ही महापालिकेच्या अभियंत्यांच्या माध्यमातून केली जाते. (Western And Eastern Express Highway)

(हेही वाचा – Underground Garbage Bins : मुंबईत साडेबारा लाखांची कचरा पेटी, कशी असेल ही कचरा पेटी, जाणून घ्या)

अभियंत्यांच्या कामाचा परिणाम रस्त्यांच्या दर्जावर

परंतु महापालिकेच्या रस्ते विभागातील अभियंत्यांवर या कामांव्यतिरिक्त निविदा बनवण्यासह इतर प्रशासकीय कामे करावी लागत असल्याने त्यांच्यावर कामाचा बराच ताण पडत असतो. त्याचा परिणामी त्यांना रस्ते कामांच्या देखरेख व गुणवत्तेवर होत असल्याने रस्त्यांच्या कामांचा दर्जा राखण्यासाठी अभियंत्यांना कामाच्या देखरेखीवर पूर्णवेळ देता येत नाही. त्यामुळे रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबत आरोप प्रत्यारोप होत असल्याने प्रशासनाने रस्त्यांच्या कामांवर देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला. (Western And Eastern Express Highway)

परिमंडळ निहाय सल्लागारांवर सुमारे ४५ कोटींचा खर्च

महापालिकेने यापूर्वी सन २०२२-२३ या वर्षात संपूर्ण मुंबईत सुमारे १९०० कोटी रुपये आणि ३८३ कोटी रुपये खोदलेले चर बुजवण्यासाठी अशाप्रकारे एकूण २२७९ रस्ते व चर बुजवण्याच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी मार्च २०२२मध्ये परिमंडळ निहाय प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थांची तीन वर्षांसाठी नेमणूक यापूर्वीच केली आहे. यासर्व कामांसाठी ४५ कोटींचा खर्च केला जात आहे. (Western And Eastern Express Highway)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : राज्यात १७ ठिकाणी ‘ऑटोमॅटीक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

दोन्ही महामार्गाच्या सुधारणेसाठी सुमारे १८३ कोटी रुपये

मात्र, नोव्हेंबर २०२२ मध्ये एमएमआरडीएच्या (MMRDA) ताब्यातील पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग आले. या पश्चिम द्रुतगती महामार्गांची पावसाळा पूर्व व पावसाळ्या दरम्यान सुधारणा करण्यासाठी के आर कंस्ट्रक्शन आणि कोणार्क स्ट्रक्चरल इंजिनिअर्स या कंपनीची निवड करून त्यांच्याकडून एक वर्षाच्या कालावधीसाठी विविध करांसह सुमारे १०८ कोटी रुपये व पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सुधारणांसाठी के आर कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करून त्यासाठी एक वर्षांसाठी विविध करांसह सुमारे ७६ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. (Western And Eastern Express Highway)

एकूण ३.६७ कोटींचा सल्लागार शुल्क

त्यामुळे दोन्ही रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासण्यासाठी महापालिकेच्यावतीने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून टेक्नोजेम कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची नेमणूक केली आहे. जिथे यापूर्वी गुणवत्ता व्यवस्थापन सल्लागार सेवेसाठी एकूण कंत्राट रकमेच्या ०.८५ टक्के दराने शुल्क अदा केली जात होती, तिथे या दोन्ही मार्गावरील कामांसाठी कंत्राट किमतीच्या २ टक्के दराने शुल्क देण्यात येत आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील गुणवत्ता सुधारणेच्या कामांसाठी तब्बल ३.६७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. (Western And Eastern Express Highway)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.