Onion Price : अहमदनगरातील कांद्याला रास्त भाव द्या; सदाशिव लोखंडे यांचे संसदेत आंदोलन

अहमदनगर जिल्ह्यातील कांदा कमी दराने खरेदी केला जात आहे. तर, नाशिक, संभाजीनगर आणि पुण्यातील कांदा जादा दराने खरेदी केला जातो.

195
Onion Price : अहमदनगरातील कांद्याला रास्त भाव द्या; सदाशिव लोखंडे यांचे संसदेत आंदोलन
Onion Price : अहमदनगरातील कांद्याला रास्त भाव द्या; सदाशिव लोखंडे यांचे संसदेत आंदोलन

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा सुध्दा समान दराने खरेदी केला जाणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिले असल्याची माहिती खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी दिली. (Onion Price)

सविस्तर वृत्त असे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी मंगळवारी (१२ डिसेंबर) संसद भवनातील गांधी पुतळ्यापुढे बसून आपली नाराजी व्यक्त केली. अहमदनगर जिल्ह्यातील कांदा कमी दराने खरेदी केला जात आहे. तर, नाशिक, संभाजीनगर आणि पुण्यातील कांदा जादा दराने खरेदी केला जातो. अहमदनगरातील शेतकऱ्यांवर हा अन्याय थांबला पाहिजे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ते उपोषणाला बसले होते. (Onion Price)

खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी यावेळी गळ्यात कांद्याची माळ आणि पाटी घातली होती. अहमदनगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणे थांबवा असे गळ्यातील पाटीवर लिहिले होते. लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंग हेही उपस्थित होते. (Onion Price)

(हेही वाचा – CIDCO : घरांच्या विक्रीसाठी सिडकोची कोट्यवधीची निविदा; ठेकेदार कंपनीला १२८ कोटी रुपये अदा)

लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी गोयल यांच्याकडे कांदा खरेदी भावाच्या संदर्भात तीन महत्वाचे मुद्दे मांडले व सविस्तर चर्चा केली. नाशिक, संभाजीनगर व पुणे जिल्ह्यात सध्या २४.०३ रुपये प्रतिकिलो कांद्याचा खरेदी भाव आहे. मात्र अहमदनगर (शिर्डी) येथे याच कांद्याचा खरेदी भाव २०.७५ पैसे प्रतिकिलो आहे. (Onion Price)

तीन रुपयांचे नुकसान भरुन काढण्याकरीता केंद्र शासनाने केंद्रीय कृषी सचिवांमार्फत संबंधीतांना तसे आदेश द्यावेत व अहमदनगर जिल्ह्यातही रु. २४.०३ प्रतिकिलो प्रमाणे कांदा खरेदी करण्याबाबतची विनंती केली. याशिवाय अहमदनगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्याची मागणी केली. कांदा निर्यात बंदी हटवावी, तसेच नाफेड आणि एनसीसीएफ (NCCF) कडून चांगल्या भावाने कांदा खरेदी केला जावा अशीही मागणी यावेळी केली. (Onion Price)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.