दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू रवींद्र बेर्डे (Ravindra Berde) यांचं बुधवारी, १३ डिसेंबरला ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते.
रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रवींद्र यांनी बंधू लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं होतं. १९९५ मध्ये ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकादरम्यान रवींद्र बेर्डे यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यावर मात केल्यावर २०११ मध्ये त्यांना कर्करोगाचं निदान झालं.
(हेही वाचा – Mahadev Online Betting App Case: महादेव बेटिंग अॅपच्या मालकाला दुबईत अटक, भारतात आणण्याची तयारी सुरू )
आजारपणातही त्यांनी त्यांची नाटकाची आवड कायम जपली. रवींद्र बेर्डे यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीही गाजवली होती. सिंघम, चिंगी, हमाल दे धमाल, चंगू मंगू, थरथराट, झपाटलेला, भुताची शाळा, गंमत जंमत, एक गाडी बाकी अनाडी, खतरनाक यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका करून आपल्या दमदार अभिनयाची छाप रसिकांच्या मनावर उमटवली होती. त्यांनी ३०० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय. १९६५पासून त्यांची नाट्यसृष्टीशी नाळ जोडली गेली. अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्यासोबतची जोडी हिट ठरली होती. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community